रस्त्यावर मोबाईलवर बोलू नका, दुचाकीवर फिरताहेत चोरटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:11 AM2021-09-21T04:11:40+5:302021-09-21T04:11:40+5:30

पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ ...

Don't talk on mobile on the road, thieves are riding bikes | रस्त्यावर मोबाईलवर बोलू नका, दुचाकीवर फिरताहेत चोरटे

रस्त्यावर मोबाईलवर बोलू नका, दुचाकीवर फिरताहेत चोरटे

googlenewsNext

पुणे : मोटारसायकल थांबवून मोबाईलवर चालक बोलत असताना पाठीमागून मोटारसायकलवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावून चोरला. ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी ‘‘पीछे नही आने का, नही तो जान से मार डालूंगा’’असे म्हणून धमकावून ते पळून गेले. शहरात गेल्या काही दिवसांमध्ये जबरदस्तीने हिसकावून घेणाऱ्या मोबाईल चोरट्यांची दहशत वाढली आहे. रस्त्याने मोबाईलवर बोलत जाण्याचीही चोरी होऊ लागली आहे.

याप्रकरणी माधव नरहरे (वय ६२, रा. आदर्शनगर, वडगाव शेरी) या ज्येष्ठ नागरिकांनी येरवडा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते १७ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलवरून घरी जात होते. गलांडे गार्डनजवळ असताना त्यांना फोन आल्याने ते रोडच्या कडेला मोटारसायकल थांबवून मोबाईलवर बोलत होते. त्यावेळी पाठीमागून दोघे जण मोटारसायकलवरून आले व त्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांना धमकावून ते चोरटे पळून गेले.

दुसरी घटना स्वारगेट येथील मित्रमंडळ चौकातील हॉटेल नैवेद्यमच्या मागील बाजूस १८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता घडली. याप्रकरणी विनय जांभळी (वय ५१, रा. दत्तनगर, कात्रज) यांनी स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. ते कट्ट्यावर बसले असता मोबाईल तेथेच वट्रून गेले. हे लक्षात आल्यावर ते पुन्हा तेथे आले़ तर मोबाईल तेथेच होता. त्यांनी मोबाईल हातात घेतल्यानंतर त्यांच्या पाठीमागून चोरटे आले व त्यांनी २३ हजार रुपयांचा मोबाईल जबरदस्तीने त्यांच्या हातातून हिसकावून घेतला व ते पर्वतीच्या दिशेने पळून गेले.

-------------

घटनांमध्ये झालीय वाढ

गेल्या काही दिवसांपासून मोबाईल चोरट्यांच्या घटना वाढतच जात आहेत. रस्त्याने मोबाईलवर बोलत असताना दुचाकीवरून येऊन तो हिसकावून नेला जात आहे. त्यामुळे रस्त्यावर मोबाईलवर बोलणं अवघड होऊन बसले आहे. विमाननगर परिसरातही घटना वाढल्या असून, या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

--------------------

Web Title: Don't talk on mobile on the road, thieves are riding bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.