वेगळा विचार करू नका, पक्ष सांगेल त्याचे काम करावे लागेल! बावनकुळेंचा पुण्यातील इच्छुकांना समज
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2024 12:43 PM2024-10-18T12:43:54+5:302024-10-18T12:45:01+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक असल्याने पक्षाने तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे, हे पक्ष श्रेष्ठीपुढे मांडण्यात येईल
पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात. याबाबत पक्षाने तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. हे म्हणणे पक्षश्रेष्ठीपुढे मांडण्यात येईल; पण पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करावे लागेल. त्यामुळे वेगळा विचार करू नका, अशा शब्दांत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुण्यातील इच्छुकांना समज दिली.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बाबनकुळे यांना भेटण्यासाठी यावे, असा निरोप शहर कार्यालयातून देण्यात आला होता. त्यानुसार चंद्रशेखर बावनकुळे यांची भाजपमधील इच्छुकांनी भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी पक्षाने यावेळी संधी दिली पाहिजे. नगरसेवक असताना काय कामे केली. त्यांची माहिती दिली. या वेळी पक्षाने विधानसभेसाठी संधी देऊन आपला विचार करावा, असे इच्छुकांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना सांगितले. त्यावर विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही इच्छुक आहात. याबाबत पक्षाने तुमचे म्हणणे ऐकून घेतले आहे. हे म्हणणे पक्ष श्रेष्ठीपुढे मांडण्यात येईल. पण विधानसभेसाठी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचे काम करावे लागेल. त्यामुळे वेगळा विचार करू नका, असे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी सांगितले.