अपयश आले तरी डगमगू नका, चिकाटीनेच मिळेल यश : महेश चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2021 04:10 AM2021-04-08T04:10:24+5:302021-04-08T04:10:24+5:30

(एकेक किरण तेजाचा लोगो) इन्ट्रो महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) या दोन्ही परीक्षेत सलग चार ...

Don't waver even if you fail, success will come only through perseverance: Mahesh Chaudhary | अपयश आले तरी डगमगू नका, चिकाटीनेच मिळेल यश : महेश चौधरी

अपयश आले तरी डगमगू नका, चिकाटीनेच मिळेल यश : महेश चौधरी

Next

(एकेक किरण तेजाचा लोगो)

इन्ट्रो

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) आणि केंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) या दोन्ही परीक्षेत सलग चार वेळा अपयश आले. मात्र, न खचता, न डगमगता चिकाटीने सातत्यपूर्ण अभ्यास आणि तंत्रात बदल करून, विद्यार्थी अधिकारी मित्रांचे मार्गदर्शन घेत पाचव्या प्रयत्नात थेट जिल्हाधिकारी पद मिळवले. वडील पोलीस सेवेत असल्याने लाईनबॉय म्हणून ओळख असलेले मूळचे जळगाव जिल्ह्यातील भुसावळचे महेश हिरालाल चौधरी यांच्या चिकाटीचा प्रवास स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.

एमपीएससी आणि यूपीएससी चार प्रयत्नांत एकदाही पूर्वपरीक्षा पास होता आली नाही. त्यामुळे काही काळ नैराश्य आले होते. परंतु, आई, वडील आणि बहिणीचा भक्कम पाठिंबा, तसेच मित्रांचे योग्य मार्गदर्शन याच्या जोरावर बी. ई. (सिव्हिल) पदवी मिळवणारे महेश चौधरी यांनी यूपीएससीच्या परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. मसुरी येथील दोन वर्षांच्या प्रशिक्षणानंतर सध्या ते मणिपूर राज्यातील तामेंगलाँग जिल्ह्यात प्रांत अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

* यूट्यूबवर ऑनलाइन व्याख्याने ऐका :

यूपीएससीची तयारी करताना सरावासाठी मी सुरुवातील एमपीएससीची तयारी केली. पूर्वपरीक्षेसाठी दैनंदिन वर्तमानपत्र, मासिके नियमितपणे वाचण करणे, त्यातील अगदी जिल्हा पातळी ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या महत्त्वाच्या घडामोडींच्या नाेंदी ठेवायचो, साेशल मीडियावर तज्ज्ञांची ऑनलाइन व्याख्याने नियमितपणे मी पाहायचो. त्यातून मला नवीन नवीन पॉईंटस मिळायचे. त्यामुळे याचा पूर्वपरीक्षा तसेच मुख्य परीक्षा अथवा मुलाखतीच्या वेळी मला फायदा झाला.

* ५५ वेळा दिली सराव परीक्षा :

चार वेळा यूपीएससी पूर्वपरीक्षेत अपयश आले. त्यामुळे वरिष्ठांचे मार्गदर्शन घेत मी जास्तीत जास्त सराव करण्यासाठी भर दिला. पूर्वपरीक्षेच्या आधी दोन महिने मी तब्बल ५५ वेळा परीक्षा दिली. त्यातून प्रत्येक वेळेस आलेल्या अडचणी, मिळालेले गुण याचे स्वत: आकलन केले. तसेच याचा अंतिम परीक्षेच्या वेळी पेपर सोडवताना वेळेच्या नियोजनात चांगला फायदा झाला.

* वैकल्पिक विषयांचे नियोजन

माझा राज्यशासन हा विषय वैकल्पिक होता. यासाठी मी एन.सी.आर.टी.ची शालेय स्तरावरील बेसिक पुस्तके, तसेच पदवी परीक्षेसाठी पुस्तकांचा वापर केला. त्याला विद्यापीठात शिकवणारे प्राध्यापक आणि ज्यांना यूपीएससीत पद मिळाले आहे, असे वरिष्ठ अधिकारी यांचे सातत्याने मार्गदर्शन हे मुख्य परीक्षेचे सामान्य अध्ययन (जनरल स्टडीज) या विषयांबरोबरच वैकल्पिक विषयांच्या तयारीला उपयोग होतो. त्यासाठी मागील पाच वर्षांतील प्रश्नपत्रिका सोडवून, त्याचे तुलनात्मक आकलन माेलाचे ठरते. त्यातून दरवर्षी परीक्षेचा ट्रेंड लक्षात येतो. तसेच त्यानुसार आपल्याला परीक्षेची तयारी करता येते.

(फोटो : आयएएस महेश चौधरी या नावाने आजच्या फोल्डरमध्ये टाकला आहे)

Web Title: Don't waver even if you fail, success will come only through perseverance: Mahesh Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.