कपड्यांना चिखल लागला तर काळजी नको ! करा हे उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2018 06:54 PM2018-06-30T18:54:22+5:302018-06-30T18:59:13+5:30
पावसाळा सगळ्यांना आवडत असला तरी या काळात कपडे चिखलाने खराब होत असल्याने अनेकांची चिडचिड होते. चिखलाच्या भीतीने पांढरे, पायघोळ आणि किंमती कपडे घालण्याचीही भीती वाटते.
पुणे :पावसाळा सगळ्यांना आवडत असला तरी या काळात कपडे चिखलाने खराब होत असल्याने अनेकांची चिडचिड होते. चिखलाच्या भीतीने पांढरे, पायघोळ आणि किंमती कपडे घालण्याचीही भीती वाटते. अनेकदा कितीही प्रयत्न केला तरी कपड्यांना चिखल लावणे टाळता येत नाही. अशावेळी लागणारे डाग काढण्याचे काही खास उपाय
- किंमती किंवा ब्रँडेड कपड्यांवर त्यांना किती तापमानात आणि कशा पद्धतीने धुवावे याच्या सूचना असतात. मनाने कपडे धुवून खराब करण्यापेक्षा दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करा.
- चिखल काढण्यासाठी थंड पाणी केव्हाही चांगले. त्यासाठी गरम पाण्याचा वापर टाळा. त्यामुळे कोमट पाण्याचा वापर कधीही चांगला ठरतो.
- चिखलाचे डाग खूप जास्त असतील तर ते वाळू द्यावेत. त्यानंतर हळूहळू कपडा घासून माती काढावी आणि त्यानंतर कपडे पाण्यात टाकावेत.
- पांढऱ्या कपड्यावर डाग असल्यास डिटर्जंट पावडर आणि काही थेंब पाणी घेऊन हातावर घासावेत आणि मग पाण्यात धुवावेत.
- चिखलाचे कपडे अनेक तास भिजवू नयेत. एखादा भिजवून वाहत्या नळाखाली धुवून टाकावेत.