पुणेकरांनो चिंता नको...! पुण्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक'; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 04:45 PM2021-07-20T16:45:11+5:302021-07-20T16:49:37+5:30

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमध्ये पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांचा समावेश..

Don't worry Pune citizens ...! Heavy 'comeback' of rains in Pune; Increase in water for dams | पुणेकरांनो चिंता नको...! पुण्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक'; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

पुणेकरांनो चिंता नको...! पुण्यात पावसाचं जोरदार 'कमबॅक'; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

Next
ठळक मुद्दे११.०३ टीएमसी साठा : भामा- आसखेडचेही पाणी मिळाल्याने पूर्व भागाला दिलासा 

पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये पावसाचे जोरदार कमबॅक झाले आहे. जूनचा शेवटचा टप्पा आणि जुलैच्या सुरुवातीच्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, गेल्या काही दिवसांत पुन्हा एकदा पावसाने राज्यभरात जोरदार कमबॅक केले आहे. पुण्याच्या खडकवासला धरणक्षेत्रात जोरदार पाऊस कोसळतो आहे. त्याचमुळे पुणे जिल्ह्यातील चारही धरणांमधीलपाणीसाठ्यात दोन टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चारही धरणात आजमितीला ११.३ टीएमसी पाणीसाठा आहे.

पावसाने अद्याप म्हणावी तशी 'बॅटिंग' सुरू केलेली नसल्याने शेतकऱ्यांना चिंता लागून राहिलेली आहे. मात्र, खडकवासला धरण साखळीमध्ये पुरेसे पाणी असून मागील वर्षीच्या तुलनेत दोन टीएमसी पाणीसाठी वाढला आहे. मागील वर्षी जुलैमध्ये ९.४७ टीएमसी पाणीसाठा होता. तर, आजमितीस ११.०३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तसेच भामा आसखेड योजनेचे पाणी मिळत असल्याने पूर्व भागालाही दिलासा मिळालेला आहे.

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीमध्ये पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांची पाण्याची साठवण क्षमता ३१ टीएमसी आहे. यामधील उपयुक्त पाणीसाठा २९.५० टीएमसी आहे. शहरासाठी सुमारे साडे अकरा टीएमसी पाणीसाठा मंजूर आहे. मात्र, पालिकेकडून प्रत्यक्षात १६ ते १७ टीएमसी पाणी उचलण्यात येते. यंदा पाऊस समाधानकारक न झाल्याने चिंता व्यक्त केली जात होती. 

मागील वर्षी पाऊस डिसेंबरपर्यंत लांबल्याने  धरणात अ २०.०२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक होते. तर, जून अखेर पर्यंत पालिकेस प्रती महिना दिड टीएमसी प्रमाणे ६ ते ७ टीएमसी पाणी मिळाले. 

शहराच्या विविध भागात नागरिकांना कमी दाबाने पाणी येणे, पाणीच न येणे, टँकरने पाणी पुरवठा सुरु असणे अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. शिवाजीनगरसारख्या मध्यवस्तीतील पाणी प्रश्नही अद्याप मार्गी लागलेला नाही. उन्हाळयात धरणातील पाणीसाठा कमी होतो. विशेषत: एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील पाण्यात कपात केली जाते. यंदाही हा शिरस्ता कायम ठेवण्यात आला होता. दरम्यान, धरणात पुरेसा पाणी साठा असल्याने पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. 

==== 

खडकवासला धरणसाखळीमधील पर्जन्यमान व पाणीसाठा
धरण।                १ जूनपासून पर्जन्यमान  धरणातील पाणीसाठा        टक्केवारी
खडकवासला               २७७                             ०.८४ टीएमसी              ४२.८४%
पानशेत                     ६०६                               ४.७८ टीएमसी              ४४.९२%
वरसगाव                   ५९५                              ४.४९ टीएमसी               ३५.०४%
टेमघर                       ८५६                              ०.९० टीएमसी               २४.४०%
एकूण                        --                                 ११.०३ टीएमसी             ३७.८३%
मागील वर्षी                --                                ९.४७ टीएमसी               ३२.४९%

Web Title: Don't worry Pune citizens ...! Heavy 'comeback' of rains in Pune; Increase in water for dams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.