दार उघड बया आता दार उघड, पोतराजाच्या नशिबी उपेक्षिताचे जिणे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 02:08 AM2019-03-18T02:08:51+5:302019-03-18T02:09:12+5:30

कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या बालचमूची झुंबड उडत आहे.

The door is open, now the door is open, the destiny of the son's destiny is lost | दार उघड बया आता दार उघड, पोतराजाच्या नशिबी उपेक्षिताचे जिणे

दार उघड बया आता दार उघड, पोतराजाच्या नशिबी उपेक्षिताचे जिणे

Next

कदमवाकवस्ती : कडकलक्ष्मी नावाची दारी येणारी भिक्षेकरीण ‘दार उघड बया आता दार उघड’ असे मरीआईला आवाहन करत भिक्षा मागणारे पोतराज लोणी स्टेशन (ता. हवेली) परिसरात दिसू लागल्याने फक्तटीव्ही, पुस्तकामध्ये पाहिलेला पोतराज खराखुरा कसा असतो, तो पाहण्यासाठी सध्याच्या इंग्रजी माध्यमाच्या बालचमूची झुंबड उडत आहे. पुणे शहरापासून अगदी जवळचा हा भाग असल्याने इथे काही वर्षांपासून शहरीकरण झपाट्याने वाढत गेले. त्यामुळे लहान मुलांना पोतराज हा फक्त टीव्ही किंवा पुस्तकातच दिसत होता.
ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. श्रद्धेच्या नावावर पोटासाठी चाबकाचे फटके अंगावर मारून घेतो, कोणताही सण असो पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसभर उन्हातान्हात ठिकठिकाणी घरोघरी फिरणाऱ्या पारंपरिक पोतराजाचे कुटुंबीय आजच्या स्पर्धेच्या व आधुनिकतेच्या युगात पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.

पूर्वी ठिकठिकाणी आवर्जून दिसणाऱ्या पोतराजाच्या नशिबी मात्र सध्या उपेक्षिताचे जिणे आले आहे. मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र असल्याचा समज आहे, तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उग्र वाटतो. लांब वाढलेले जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं कमरेचं वस्त्र, त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेश असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा सलग ध्वनी निर्माण करत दुसºया बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो.

Web Title: The door is open, now the door is open, the destiny of the son's destiny is lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे