डोर्लेवाडीचा बीज उत्सव रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:10 AM2021-03-28T04:10:54+5:302021-03-28T04:10:54+5:30
प्रति देहू समजल्या जाणऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५० ...
प्रति देहू समजल्या जाणऱ्या डोर्लेवाडी (ता. बारामती) येथे संत तुकाराम महाराज बीज यात्रेनिमित्त पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील सुमारे ५० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी येत असतात. गेल्यावर्षी यात्रा झाल्यानंतर काही दिवसातच राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्यामुळे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे येथील यात्रा ही शेवटची यात्रा ठरली होती. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी पुणे जिल्ह्यासह बारामती तालुक्यात कोरोनाची परिस्थिती भयंकर असल्याने बीजेचा उत्सव, यात्रा साजरी करणे उचित ठरणार याचा विचार करून व प्रशासनास सहकार्य करण्याच्या हेतूने येथील मंगळवारी होणारी यात्रा व गुरुवारचा आठवडे बाजार रद्द करण्याचा निर्णय संत तुकाराम महाराज देवस्थान समिती व ग्रामपंचायतीच्या वतीने घेण्यात आला आहे.
यावेळी बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, सरपंच बाळासाहेब सलवदे, देवस्थान समितीचे प्रमुख अशोक नवले, रमेश मोरे, तंटामुक्त अध्यक्ष मिलिंद भोपळे, पोलीस पाटील नवनाथ मदने, ग्रामपंचायत सदस्य रामभाऊ कालगावकर, दत्तात्रय काळोखे, दादा दळवी, संदीप नाळे, सचिन दळवी आदी उपस्थित होते.