पुणे महापालिकेच्यावतीने तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’चा डोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 08:33 PM2020-01-18T20:33:48+5:302020-01-18T20:34:20+5:30

सर्व बालकांना या लसीचे दोन थेंब देऊन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन

Dosage of 'polio' to three million children | पुणे महापालिकेच्यावतीने तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’चा डोस

पुणे महापालिकेच्यावतीने तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’चा डोस

Next
ठळक मुद्देएकूण चौदाशे बूथ, साडेचार हजार कर्मचारी सज्ज

पुणे : राष्ट्रीय पल्स मोहिमेंतर्गत रविवारी (दि. १९) रोजी ० ते ५ या वयोगटातील तब्बल तीन लाख बालकांना  ‘पोलिओ’ची लस दिली जाणार आहे. सर्व बालकांना या लसीचे दोन थेंब देऊन मोहिम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे.
महापालिकेच्यावतीने राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम-२०२० साठी तयारी केली आहे. या मोहिमेद्वारे ० ते ५ वर्ष या वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देणे बंधनकारक आहे. या मोहिमेची आढावा बैठक बुधवारी घेण्यात आली. या बैठकीमध्ये आरोग्य प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे, सहायक आरोग्य अधिकारी डॉ. वैशाली जाधव, लसीकरण अधिकारी डॉ. अमित शहा, समन्वय अधिकारी डॉ. सुर्यकांत देवकर, यांच्यासह बाल विकास प्रकल्प अधिकारी आणि अंगणवाडी पर्यवेक्षक उपस्थित होते. 
पालिका हद्दीतील वीटभट्टया, स्थलांतरीत वस्त्या, बांधकाम सुरु असलेली ठिकाणे अशा जोखमीच्या भागातील बालकांना लस देण्याकरिता विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच रेल्वेस्थानक, बस स्थानक, उद्याने, महामार्ग इत्यादी ठिकाणी विशेष बुथ कार्यरत राहणार आहेत. ‘‘या मोहिमेंतर्गत ० ते ५ वर्ष वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,’’ असे आवाहन आयुक्त सौरव राव यांनी केले आहे.

Web Title: Dosage of 'polio' to three million children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.