दिवेकर क्रिकेट अकादमीचा डबल धमाका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:11 AM2021-03-16T04:11:28+5:302021-03-16T04:11:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक बारा व चौदा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्राधिकरण जिमखान्याच्या वतीने आयोजित प्रेसिडेंट करंडक बारा व चौदा वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरीत बारा वर्षांखालील गटात संतोष चौहान (४५ धावा)च्या सुरेख फलंदाजीच्या जोरावर दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने प्राधिकरण जिमखाना संघाचा दोन धावांनी पराभव करून विजेतेपद पटकावले.
निगडीच्या मदनलाल धिंगरा मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम लढतीत बारा वर्षांखालील गटात अंतिम फेरीच्या लढतीत पहिल्यांदा खेळताना दिवेकर क्रिकेट अकादमी संघाने १५ षटकांत ४ बाद ११० धावा केल्या. यात संतोष चौहान, आदित्य कापरे, साई बोऱ्हाडे, आर्यन यादव यांनी संघाला आकार दिला. प्रत्युत्तरात प्राधिकरण जिमखाना संघाचा डाव १५ षटकांत ६ बाद १०८ धावाच करू शकला. दिवेकरकडून ओमकार रसाळ (१-८) याने अचूक गोलंदाजी केली. सामनावीर संतोष चौहान ठरला.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण पिंपरी-चिंचवडच्या महापौर उषा ढोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नामदेव ढाके यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल :
अंतिम फेरी :
बारा वर्षांखालील गट : दिवेकर क्रिकेट अकादमी : पंधरा षटकांत ४ बाद ११० धावा, संतोष चौहान ४५, आदित्य कापरे १७, साई बोऱ्हाडे १४, आर्यन यादव १०, वेदांत चौधरी १-१० वि.वि. प्राधिकरण जिमखाना : १५ षटकांत ६ बाद १०८ धावा, अर्णव कानडे नाबाद ३८, रणवीर राजपूत २५, ओमकार रसाळ १-८; दिवेकर क्रिकेट अकादमी संघ २ धावांनी विजयी.
चौकट
स्पर्धेतील सर्वोत्तम
१२ वर्षांखालील गट :
सर्वोत्कृष्ट फलंदाज : प्रचित भळगट (१९३ धावा, तिकोने क्रिकेट गुरुकुल),
सर्वोत्कृष्ट गोलंदाज : आदित्य कापरे (८ बळी, दिवेकर क्रिकेट अकादमी),
मालिकावीर : संतोष चौहान (२७३ धावा, दिवेकर क्रिकेट अकादमी),
सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक : हर्ष ओस्वाल (३ झेल, ४ धावचित, ५ यष्टीचीत)