राजगुरुनगरवासीयांची रक्तदानाची डबल सेंच्युरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:09 AM2021-07-21T04:09:29+5:302021-07-21T04:09:29+5:30

दैनिक लोकमत व बजरंग दल आयोजित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले ...

Double Century of Blood Donation of Rajgurunagar Residents | राजगुरुनगरवासीयांची रक्तदानाची डबल सेंच्युरी

राजगुरुनगरवासीयांची रक्तदानाची डबल सेंच्युरी

googlenewsNext

दैनिक लोकमत व बजरंग दल आयोजित धर्मवीर चंद्रशेखर अण्णा बाणखेले यांच्या दहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात २२३ रक्तदात्यांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी शंकर मठाचे १०८ यती प्रमेश्वर महाराज, अॅड. नीलेश बाळासाहेब आंधळे, जिल्हा संयोजक संतोष खामकर, मंचर संयोजक अक्षय जगदाळे, मनसे जिल्हाध्यक्ष समीर थिगळे, सह्याद्री प्रतिष्ठाणचे बाबासाहेब दिघे, रोटरी क्लबचे अध्यक्ष अजित वाळुंज, गणेश घुमटकर, जितेंद्र गुजराथी, अविनाश कहाणे, अविनाश कोहिणकर,पवन कासवा, विठ्ठल सांडभोर, राहुल वाळुंज, सुधीर येवले, चक्रधर खळदकर, जयंत घोरपडे, प्रवीण वायकर, डॉ. अशिष गुजराथी, डॉ. कुणाल तांबे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

बजरंग दल गोरक्षा प्रमुख गणेश रौधळ, शहर संयोजक अक्षय पऱ्हाड, ओंकार सोनार, सह संयोजक मयूर सावंत, दीपक गावडे, योगीराज करवंदे, दत्ता पोखरकर, शाखा संयोजक नितीन काळे, आदेश शिंदे, सौरभ पाटोळे, तेजस भानुसे, सह-संयोजक मोहनदास गावडे, अमोल डमरे, सागर खैरनार, भाजपाचे योगेश पवार, सागर तनपुरे, अमोल काळे, अनिकेत वाळुंज, ग्रा.पं.सदस्य नरेंद्र वाळुंज, रा.स्व. संघाचे विश्वजित दीक्षित, कृष्णा कुलकर्णी, दीक्षित काका आदी कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

आमदार दिलीप मोहिते पाटील, विश्व हिंदू परिषद कार्याध्यक्ष धनाजी शिंदे, बजरंग दल विभाग संयोजक संदेश भेगडे, आंबेगाव तालुका सहसंयोजक गणेश राऊत, राजगुरुनगर सहकारी बँकेचे संचालक सतीशशेठ नाईकरे यांनी रक्तदान शिबिराला भेट देऊन रक्तदात्यांचा उत्साह वाढवला.रक्तदान शिबिरासाठी पुणे ब्लड बँक यांनी सहकार्य केले. यावेळी प्रत्येक रक्तदात्यास सॅनिटायझर, मास्क, व एक झाड देण्यात आले.

--

फोटो क्रमांक : २०राजगुरुनगर रक्तदान

फोटो ओळ: राजगुरूनगर येथील रक्तदान शिबीरात २२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यावेळी युवक कार्यकत्ये..

.

Web Title: Double Century of Blood Donation of Rajgurunagar Residents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.