गरवारे महाविद्यालयात ‘दुहेरी पदवी’ अभ्यासक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:14 AM2021-08-20T04:14:08+5:302021-08-20T04:14:08+5:30
गरवारे महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्यानंतर, विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे आचार्य बोलत होत्या. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे ...
गरवारे महाविद्यालयाला स्वायत्तता मिळाल्यानंतर, विविध योजनांची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेचे आचार्य बोलत होत्या. या वेळी महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉ. भरत व्हनकटे, उपप्राचार्य डॉ. आनंद लेले, डॉ. केतकी मोडक, प्रा. विनय चाटी आदी उपस्थित होते.
डॉ. आचार्य म्हणाल्या की, महाविद्यालयात बीबीए, बीबीए इन आयबी, बीबीए इन सीए असे अभ्यासक्रम शिकवले जात आहेत. या अभ्यासक्रमांचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ड्युएल डिग्री घेण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी हल विद्यापीठाशी करार करण्यात आला आहे. चार वर्षे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, विद्यार्थ्यांना ड्युएल डिग्री मिळवता येणार आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून रोजगाराभिमुख अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी महत्त्व देण्यात आले असून त्यासाठी आंतरविद्याशाखीय पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येतील. संस्थेच्या पाच महाविद्यालयांच्या सहकार्याने हे अभ्यासक्रम सुरू केले जातील. विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण मिळाले पाहिजे. त्यासाठी कॉपोर्रेट कंपन्यांशी करार करण्यात येणार असल्याचे आचार्य यांनी सांगितले.
चौकट
चिपळूण येथे ‘सॅटेलाइट’ केंद्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहकार्याने चिपळूण येथे महाविद्यालयाचे सॅटेलाइट सेंटर सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. विद्यापीठाची मान्यता मिळाली की, सॅटेलाइट सेंटर होईल. यामुळे चिपळूणमधील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित नवे अभ्यासक्रम शिकता येतील. विद्यार्थ्यांना रोजगार मिळण्याच्या दृष्टीने अभ्यासक्रमांमध्ये बदल केले जातील, असे डॉ. भरत व्हनकटे यांनी सांगितले.