अॅप डाऊनलोड करताय? सावधान! तुमच्या बँकेतून पैसे गायब होऊ शकतात (स्टार डमी 967)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:09 AM2021-07-25T04:09:04+5:302021-07-25T04:09:04+5:30

पुणे : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुटुंबाचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी बहुतांश लोकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. ...

Downloading the app? Be careful! Money may disappear from your bank (Star Dummy 967) | अॅप डाऊनलोड करताय? सावधान! तुमच्या बँकेतून पैसे गायब होऊ शकतात (स्टार डमी 967)

अॅप डाऊनलोड करताय? सावधान! तुमच्या बँकेतून पैसे गायब होऊ शकतात (स्टार डमी 967)

googlenewsNext

पुणे : कोरोनाच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. कुटुंबाचे आर्थिक गणित सांभाळण्यासाठी बहुतांश लोकांनी छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. पण एखादा व्यवसाय सुरू करायचा म्हटला की भांडवल हवंच! ते मिळवायचे म्हणजे कर्ज घेणं ओघानं आलंच. समाजाची हीच मानसिकता ओळखून ‘त्वरित कर्ज हवंय’ मग हे विशिष्ट अॅप डाऊनलोड करा, तुम्हाला हव्या त्या दराने कर्ज उपलब्ध उपलब्ध करून दिलं जाईल. यांसह विविध आमिषांना भुलून अनेक जण मोबाईल अॅप डाऊनलोड करतात आणि मग नंतर त्यांच्या खात्यातून रक्कम गायब झाल्याचे कळते. गरजू लोकांना जाळ्यात ओढण्यासाठी सायबर चोरट्यांच्या टोळ्या सक्रिय झाल्या असून, मोबाईल अॅप डाऊनलोड करताच त्यांच्या खात्यातून परस्पर रक्कम काढून गंडा घालण्याच्या घटना वाढत आहेत.

मोबाईल अॅप वापरणाऱ्यांची वाढती संख्या पाहून चोरट्यांनी देखील आता आपला मोर्चा सायबर गुन्हेगारीकडे वळविला आहे. अनेक जणांना अॅप डाऊनलोड करताना आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे याची माहितीच नसल्याने सायबर गुन्हेगार त्याचा गैरफायदा घेत आहेत. यात ज्येष्ठ नागरिकांचे फसवणूक होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे तुम्हाला जर विशिष्ट अॅप डाऊनलोड करा, असा कुणी मेसेज किंवा फोन करून सांगितले तर सर्वप्रथम खातरजमा करा, असा इशारा सायबरतज्ज्ञांनी दिला आहे.

-------------

केस 1 : पुण्यात एका प्रतिष्ठित उपाहारगृहाची जाहिरात सोशल मीडियावर फिरत होती. एका ग्राहकाला पार्सल मागवायचे होते. त्याने ती जाहिरात वाचून विशिष्ट क्रमांकावर संपर्क केला. तर त्यांना एक अॅप डाऊनलोड करून त्यावर पैसे पाठवायला सांगितले. सुरुवातीला १० रूपये पाठवा असे म्हटल्यानंतर त्यांनी पैसे पाठविले आणि थोड्याच वेळात त्यांच्या बँक खात्यातून ५० हजार रूपये काढून फसवणूक केल्याचे समोर आले.

-------------------------------------------

केस 2 : बँकेकडून केवायसी अपडेट करण्याचे पत्र आल्यानंतर मोबाईलवर एक मेसेज आला. तो बँकेकडून आल्याचे समजून महिलेने त्यावरची लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून सायबर चोरट्यांनी अडीच लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातला. तब्बल १४ वेळा आॅनलाईन व्यवहार करून ही रक्कम काढून फसवणूक करण्यात आली.

--------------------------------------------

जानेवारी २०२१ ते आजपर्यंत सायबर सेलकडे दाखल फसवणुकीच्या तक्रारी : ९२७३

तत्काळ तक्रार दाखल होण्याचे प्रमाण : ४० टक्के

तक्रार दाखल करण्यास लागणाऱ्या विलंबाचे प्रमाण : १० टक्के

----------------------------------------------

सायबर फसवणुकीचे प्रकार

ऑनलाईन बँकिंग/कार्ड फसवणूक : ४५ टक्के

ऑनलाइन व्यवसाय : २२ टक्के

हँकिंग : २ टक्के

सोशल नेटवर्किंग संबंधित फसवणूक : २५ टक्के

---------------------------

अशी केली जाते सायबर चोरी?

बहुतांश अॅप तुमच्या मोबाईलमधील अन्य अॅप हाताळण्याची परवानगी मागतात आणि आपल्याकडून ती नकळतपणे दिली जाते. त्यामुळे तुमची खासगी माहिती त्यांना सहज मिळते. तसेच तुम्ही वापरत असलेल्या ऑनलाईन पेमेंट अॅपमध्ये उपलब्ध असलेला तुमचा खाते क्रमांक, पासवर्ड आणि एसएमएससारख्या सर्व गोष्टी सहजपणे मिळवता येतात. याचा वापर करून तुमच्या बँक खात्यातून रक्कम सहज काढली जाते.

----------------------------

नवीन अॅप डाऊनलोड करताना काय काळजी घ्याल?

* नवीन अॅप डाउनलोड करण्यापूर्वी नेहमीच त्याचे रिव्यू आणि रेटिंग्ज तपासा.

*अॅप इंस्टॉल करण्यापूर्वी परमिशन तपासा.

-----------------

सध्या ‘एनी डेस्क’ नावाचे अॅप हे मोठ्या प्रमाणावर वापरले जात आहे. हे सॉफ्टवेअर टाका असे सांगितले जाते आणि मग मोबाईलमधील सर्व खासगी माहिती हॅकर्सकडे जाते. बँकेकडून जे ओटीपी येतात ते हॅकर्सला पण दिसतात आणि मग पैसे काढले जातात. बँकेच्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीचा फोन आल्यास खातरजमा करावी. त्यांना त्यांचा आयडेंटिफिकेशन विचारा. आरबीआयच्या नियमानुसार बँक कोणत्याही ग्राहकाला फोन करून खासगी माहिती विचारू शकत नाही. एखादी लिंक पाठवून पैसे मागविण्याचा बँकांना अधिकार नाही. त्यामुळे कोणतीही लिंक ओपन करायची नाही. गुगल पे ला देखील बँकिंग सिस्टिम म्हणून गृहीत धरत नाही. या गोष्टी ग्राहकांनी लक्षात ठेवल्या तर सायबर फसवणुकीला आळा बसेल.

- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ

------------------------------

Web Title: Downloading the app? Be careful! Money may disappear from your bank (Star Dummy 967)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.