डॉ बाबा आढाव यांचे उपोषण सुरु
By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 07:41 PM2019-09-18T19:41:20+5:302019-09-18T19:42:18+5:30
मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भातील समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होऊन अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून बाजार समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले.
पुणे : मार्केट यार्डातील भुसार विभागातील तोलणारांच्या संदर्भातील समितीचा अहवाल राज्य सरकारला प्राप्त होऊन अद्यापही त्याबाबत निर्णय झाला नाही. त्यामुळे ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून बाजार समितीच्या कार्यालया समोर उपोषण सुरु केले.
तत्कालीन पणन संचालक डॉ. सुभाष माने यांनी इलेक्ट्रॉनिक वजन काटे असलेल्या दुकानात तोलणारांची गरज नाही, असे परिपत्रक काढले होते. त्या परिपत्रकाची दी पूना मर्चंट्स चेंबरने अंमलबजावणी केली. त्यानुसार तोलणारांना काम न देण्याची भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. त्यावरून व्यापारी आणि हमालांमध्ये संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षामुळे हमालांबरोबर कामगारांनी संपाची भूमिका घेतली. त्यामुळे संघर्ष वाढला होता. त्यावर बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख यांनी तोडगा काढण्याची भूमिका घेतली. त्यानंतर पणनमंत्री राम शिंदे यांनी बाजारातील सर्व घटकांची बैठक घेतली. त्या बैठकीत २२ ऑगस्टपर्यंत अहवाल देण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या होत्या.
पणन मंडळाचे सुनील पवार यांच्या समितीचा अहवाल पणन खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्यावर सरकारने निर्णय घेणे अपेक्षित आहे. निर्णय घेण्यात येण्याच्या शक्यतेने कामगारांचे आंदोलन स्थगित करण्यात आले. याबाबत सरकारने निर्णय घेण्याचे आश्वासन देऊन अद्याप निर्णय घेतलेला नाही. समितीला सर्व सहकार्य करण्यात आले आहे. 'विधानसभेच्या निवडणुकांची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पूर्वी निर्णय़ न झाल्यास तोलणारांची उपासमार सुरुच राहील, अशी भीती आहे. यामुळे कामगार नेते डॉ. बाबा आढाव आजपासून उपोषणला बसले आहेत