डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 08:15 PM2020-04-15T20:15:31+5:302020-04-15T20:48:47+5:30

अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, Lockdown and Akuluj's Days! | डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, लॉकडाऊन अन् अकलूज डेज!

googlenewsNext

    - प्रविण गायकवाड

आपण सारेच Quarantined आहोत. मी आणि माझा मुलगा पृथ्वीराज आज अकलूजच्या घरी असताना आम्ही dynamic personality डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलत होतो. तो सध्या  ‘Regents University London’ येथे उच्च शिक्षण घेतोय परंतु महामारीमुळे तो सध्या भारतात आहे. त्याच्या पदवी शिक्षणानंतर त्याने परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यावे असं मी त्याला उङ्मल्ल५्रल्लूी करत होतो पण त्याची तशी तयारी नव्हती. गेल्या वर्षी एका दिवशी तो सहज मला अनेक प्रश्न विचारु लागला, बाबासाहेबांबद्दल, संविधान, अधिकार, आंबेडकरांचे शिक्षण, इत्यादी गोष्टींवर आम्ही दोघांनी चर्चा केली. मी त्याला सांगितलं की बाबासाहेबांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात व इंग्लंडमधील लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून शिक्षण घेतलं आहे. पृथ्वीराज त्यावर म्हणाला,म्हणूनच बाबासाहेबांनी आपल्याला संविधानाच्या माध्यमातून न्याय व हक्क दिले अन् त्याचा फायदा करोडो लोकांना झाला. पुढे तो म्हणाला, मला ही लंडनला Masters साठी जायचंय. हे ऐकताच मला आश्चर्य वाटलं पण आनंद याचा झाला की तो बाबासाहेबांना आदर्श मानून त्यांची प्रेरणा घेऊन लंडनला शिकायला गेला. 

तसेच संविधानाचे अधिकार याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. त्याबद्दल अधिकाधिक चिंतन होणं गरजेचं आहे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते... ती म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा हा ९ डिसेंबर १९५० रोजी कोल्हापूर येथील बिंदू चौकात बसवला गेला. अजून चांगलं म्हणजे करवीर नगरीत त्यांच्या पुतळ्यासमवेत त्यांचे गुरु महात्मा फुले यांचाही पुतळा त्याचवेळेस बसवला गेला. पुढच्या काळात बाबासाहेब हे बेळगाव येथे जात असताना त्यांनी त्यांच्या पुतळ्याला भेट दिली. हे दोन्ही पुतळे भाई माधवराव बागल यांनी उभारले. ते शाहू महाराजांचे अनुयायी होते. त्या अगोदर जेव्हा २३ वर्षीय बाबासाहेब परदेशातून शिकून आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलवून हत्तीवरुन मिरवणूक काढून साखऱ्या वाटप केले व त्यांचा मोठा सन्मान केला. तसेच माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली होती.अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

तसेच संविधानाचे अधिकार याबद्दल आम्ही चर्चा करत होतो. त्याबद्दल अधिकाधिक चिंतन होणं गरजेचं आहे. एक गोष्ट मला सांगावीशी वाटते... ती म्हणजे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा प्रथम पुतळा हा ९ डिसेंबर १९५० रोजी कोल्हापूर येथील बिंदू चौकात बसवला गेला. अजून चांगलं म्हणजे करवीर नगरीत त्यांच्या पुतळ्यासमवेत त्यांचे गुरु महात्मा फुले यांचाही पुतळा त्याचवेळेस बसवला गेला. पुढच्या काळात बाबासाहेब हे बेळगाव येथे जात असताना त्यांनी त्यांच्या पुतळ्याला भेट दिली. हे दोन्ही पुतळे भाई माधवराव बागल यांनी उभारले. ते शाहू महाराजांचे अनुयायी होते. त्या अगोदर जेव्हा २३ वर्षीय बाबासाहेब परदेशातून शिकून आले तेव्हा शाहू महाराजांनी त्यांना कोल्हापूरला बोलवून हत्तीवरुन मिरवणूक काढून साखर वाटप केले व त्यांचा मोठा सन्मान केला. तसेच माणगाव येथे अस्पृश्यांची परिषद घेण्यात आली होती. अस्पृश्यांना नेता मिळाला अन् आता माझी काळजी मिटली, असे शाहूंनी बाबासाहेबांचा गौरव करत भाषणात सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  Scheduled Caste व Scheduled Tribes साठी स्वतंत्र मतदार संघाची मागणी प्रथम गोलमेज परिषदेत केली. ब्रिटिश सरकारला पटवून त्यांनी ते अधिकार मिळवले.  परंतु महात्मा गांधी यांनी त्या विरोधात उपोषण केले व दोघांच्या चर्चेनंतर ह्यपुणे करारह्ण करण्यात आला. हाच मुद्दा पुढे १९८० ला कांशीराम यांनी उचलला अन् पुणे करार, धिक्कार करार! असा नारा दिला. बाबासाहेबांना प्रेरणा मानून कांशीराम यांनी चळवळ उभी करुन  ‘Backward & Minority Communities Employees Federation (BAMCEF)’ ची स्थापना केली. त्यांचे मार्गदर्शक डी. के. खापर्डे यांना ॲम्युनिशन फॅक्टरी खडकी येथे शिवजयंती व भीमजयंती साजरी करायला संघर्ष करावा लागला. कांशीराम यांना पुढे सरकारी कामातून बडतर्फ करण्यात आलं. मग डी. के. खापर्डेंनी त्यांना महात्मा फुले व बाबासाहेबांची काही पुस्तकं दिली. त्यात त्यांनी ‘Annihilation of Caste’ हे पुस्तक वाचून प्रेरीत झाले व तिथून पुढे संपूर्ण आयुष्य कांशीराम यांनी सामाजिक कार्यासाठी घालवले. ते आंबेडकरांच्या तत्वावर चालून पुढे यशस्वी राजकारणी झाले. खऱ्या अर्थाने ‘Politics is Master Key’ हे त्यांना समजले होते. 

कांशीराम, डी के खापर्डे, बाबासाहेबांचे नातू ॲड. प्रकाश आंबेडकर, नामदेव ढसाळ, राजा ढाले यांनी बाबासाहेबांचे विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. मला यानिमित्ताने वामन मेश्राम यांचेही धन्यवाद मानायचे आहेत. कारण BAMCEF सोबत माझी जवळीक आहे. तसेच बाबासाहेबांचा वैचारिक वारसा जपणारे प्रा. मा म देशमुख, डॉ. आ. ह. साळुंखे, रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, अविनाश म्हातेकर, रमेश राक्षे, इत्यादी लोकांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. 

गेल्यावर्षी मी, रोहितदादा पवार व प्रज्ञेश मोळक (साकू), आम्ही कोल्हापूरला गेलो असता बिंदू चौकात जाऊन बाबासाहेबांच्या जगातील प्रथम पुतळ्यास वंदन केले. तेथील हा फोटो आहे. शेवटी एकच की बाबासाहेबांना सामाजिक समता प्रस्थापित करायची होती अन् ती त्यांनी केली परंतु त्यांची एक खंत विसरता कामा नये ती म्हणजे त्यांना  ‘Real Representation’ हवे होते व खरे प्रतिनिधी निवडून पाठवायचे होते अन् त्याचबरोबर आर्थिक समानता या देशात त्यांना आणायची होती. मात्र ते काही झालं नाही. हीच खंत मनात बाळगून आज आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यावर विचार करुया, चिंतन करुया अन् बाबासाहेबांच्या विचारांवर चालूया..!

                                                                                                                                         (लेखक संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.) 
                                                                                                                             

Web Title: Dr. Babasaheb Ambedkar Jayanti, Lockdown and Akuluj's Days!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.