डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 08:42 AM2023-11-30T08:42:38+5:302023-11-30T08:55:09+5:30

यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती.

Dr. Back to Pavilion in Vinayak Kale at Sassoon Hospital; Dr. Sassoon's successor. Appointment of blacks | डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती

डॉ. विनायक काळे ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन; ससूनच्या अधिष्ठातापदी डॉ. काळेंची नियुक्ती

ज्ञानेश्वर भोंडे

पुणे:  ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची पुन्हा वैद्यकीय शिक्षण विभागाने नियुक्ती केली असून बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे, काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार असून आज (गुरुवार) ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. 
 
यावर्षी जानेवारी महिन्यात डॉ. विनायक काळे यांची बदली शासनाने महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेवर केली होती आणि त्यांच्या ठिकाणी डॉ. संजीव ठाकूर यांची नियुक्ती केली होती. एकप्रकारे डॉ. ठाकूर यांनी राजकीय वजन वापरून त्यांचा पत्ता कट केला होता. त्याविरोधात डॉ. काळे महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) मध्ये गेले होते. 'मॅट’ ने सहा महिन्यानंतर जुलै महिन्यात डाॅ. काळे यांच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर डाॅ. काळे वैदयकीय शिक्षण विभागाकडून त्यांना ससूनच्या अधिष्ठाता पदाची ऑर्डर देण्याची प्रतीक्षा करत हाेते. परंतू, डाॅ. ठाकुर यांनी ‘मॅट’ च्या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.  

 यानंतर काळे यांच्या बाजूने उच्च न्यायालयाने निर्णय दिला. तसेच ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणाही डॉ. संजीव ठाकूर यांना वैद्यकीय शिक्षण विभागाने पदमुक्त केले. तेव्हापासून या पदावर डॉ. काळ येणार अशी चर्चा होती. परंतु वैद्यकीय शिक्षण विभागाने त्यांची ऑर्डर काढली नव्हती. त्यांची फाईल थेट मुख्यमंत्री यांच्याकडे होती अशी चर्चा होती. अखेर, बुधवारी डॉ. काळे यांची शासनाने ऑर्डर काढली आहे. 

Web Title: Dr. Back to Pavilion in Vinayak Kale at Sassoon Hospital; Dr. Sassoon's successor. Appointment of blacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.