बारामतीत डॉ. बाबासाहेब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:26+5:302021-04-15T04:10:26+5:30

बारामती: शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. शहरातील इंदापूर रस्त्यालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

Dr. Baramati. Babasaheb | बारामतीत डॉ. बाबासाहेब

बारामतीत डॉ. बाबासाहेब

googlenewsNext

बारामती: शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साधेपणाने साजरी करण्यात आली.

शहरातील इंदापूर रस्त्यालगतच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मरकाजवळ बुधवार(दि.१४) रोजी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव,नगरसेवक नवनाथ बल्लाळ, तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, मुख्याधिकारी किरणराज यादव आदींच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. बुद्ध पूजापाठाचा कार्यक्रम करुन साध्या पद्धतीने संपन्न करण्यात आला. यावेळी कोविडच्या शासकिय नियमांचे पालन करीत सोशल डिस्टन्स राखण्यात आले.

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी यावर्षी बारामती शहरात साध्या पद्धतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने साधेपणाने जयंती उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी बारामती शहरातील सिद्धार्थ नगर,सुहास नगर,चंद्रमणी नगर,अंनत नगर,प्रबुद्ध नगर याठिकाणी कोरोनाच्या त्रिसूत्रीचे पालन करत पूजापाठ घेण्यात आला.

बारामतीचे माजी नगराध्यक्ष कैलास चव्हाण, माजी उपनगराध्यक्ष भारत अहिवळे, माजी नगरसेवक सुधीर सोनवणे, किशोर सोनवणे, उपनगराध्यक्ष अभिजित जाधव, गटनेते सचिन सातव, नगरसेविका निता चव्हाण, अनिता जगताप, मयुरी शिंदे, ज्योती सरवदे, आरती शेंडगे, नगरसेवक बिरजू मांढरे, गणेश सोनवणे, राजेंद्र बनकर, कुंदन लालबिगे, नवनाथ बल्लाळ, माजी नगरसेवक अभिजित चव्हाण, सुरज शिंदे, दिनेश जगताप, अप्पा अहिवळे, विजय खरात, काळुराम चौधरी, सचिन साबळे, अ‍ॅड. विनोद जावळे आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव समितीचे अ‍ॅड. सुशिल अहिवळे, गौतम शिंदे, प्रा. रमेश मोरे, शंकर गव्हाळे, सचिन काकडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.

दरम्यान, बौद्ध युवक संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. १३) रात्री गरुडा गुळीक यांचा भीम गीतांचा कार्यक्रम फेसबुक वर लाईव्ह करण्यात आला होता. नगरसेवक नवनाथ बल्लाळ,सचिन साबळे,सिध्दार्थ सोनवणे,अमोल वाघमारे,निलेश मोरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शासकीय अधिकारी, पदाधिकारी आदींनी अभिवादन केले.

१४०४२०२१-बारामती-१०

Web Title: Dr. Baramati. Babasaheb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.