डॉ. स. मो. अयाचित यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:09 AM2021-07-16T04:09:44+5:302021-07-16T04:09:44+5:30
नागपूर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कार्य तर केलेच; परंतु हस्तलिखित विभागाला आकार देऊन विकसितही केला. ...
नागपूर विद्यापीठातील हस्तलिखित विभागातील प्रमुख अधिकारी म्हणून त्यांनी उत्तम कार्य तर केलेच; परंतु हस्तलिखित विभागाला आकार देऊन विकसितही केला. नागपुरातील ''संस्कृत भवितव्यम्'' या संस्कृत साप्ताहिकाचे कार्यवाह आणि संपादक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. विदर्भ संशोधन मंडळाचे ते सन्माननीय सदस्य होते.
''सिन्दुरगिरीमाहात्म्य'' काव्याचे पाठचिकित्सेसह संपादन आणि डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या ''वैदिक साहित्यात धर्माचा उगम आणि विकास'' या पुस्तकाचा मराठी अनुवाद तसेच ''श्रीप्रतापदुर्गमाहात्म्यम्'' आणि ''परमानंदकाव्यम्'' या दोन काव्यांचा मराठी अनुवाद आणि ''पोस्ट इंडिपेन्डन्स संस्कृत लिटरेचर'' हा संपादित ग्रंथ ही त्यांच्या कार्यकाळातील महत्त्वाची प्रकाशने होत. नागपूर विद्यापीठातील हस्तलिखितांच्या सूचीचे तीन खंड प्रकाशित करण्याचे कार्यही त्यांच्या नावावर आहे. त्यापैकी पहिली सूची ही त्यांच्या कार्यकाळात प्रकाशित झाली, तर शिल्लक दोन सूची ते निवृत्त झाल्यावर प्रकाशित झाल्या.