डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:42 AM2018-04-14T00:42:43+5:302018-04-14T00:42:43+5:30
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा, तसेच शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, दर्शनासाठी जमा होतात.
पुणे : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पुणे जिल्हा, तसेच शहरातील विविध भागातून मोठ्या संख्येने नागरिक पुणे स्टेशन परिसरातील आंबेडकर उद्यान येथे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करणे, दर्शनासाठी जमा होतात. त्या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी होऊ नये, यासाठी परिसरातील रोडवरील वाहतुकीमध्ये उद्या (दि. १४) सकाळी सहा वाजल्यापासून रात्री गर्दी कमी होईपर्यंत वाहतुकीत बदल करून वाहने पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार असल्याची माहिती वाहतूक शाखेच्या वतीने देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बोल्हाई चौकातून पुणे स्टेशनकडे जाणारा रस्ता, बोल्हाई चौक ते साधू वासवानी चौक, जी. पी. ओ. जंक्शनकडून बोल्हाई चौक, चर्च रोडवरील समाजकल्याण चौकातून फोटो झिंको प्रेसकडे जाणारा रस्ता तसेच अलंकार टॉकीज चौकातून जहाँगीर हॉस्पिटल चौकाकडे जाण्यास वाहनचालकांना मनाई करण्यात येत आहे.
मालधक्का चौक ते बोल्हाई चौक ते पुणे स्टेशन, साधु वासवानी चौक ते बोल्हाई चौक, बोल्हाई चौक ते नरपतगीर चौक, फोटोझिंको प्रेसजवळ वाहनांना नो-पार्किंग करण्यात येत आहे. पुणे स्टेशन परिसरात आलेल्या नागरिकांनी त्यांची वाहने आर. टी. ओ.शेजारी एस. एस. पी. एम. एस. संस्थेचे मैदान किंवा शाहीर अमर शेख चौक ते कुंभारवेस ते गाडगीळ पुतळा या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा येऊ नयेत, अशा रीतीने पार्क करावीत.
वाहतुकीस बंदी, तसेच पर्यायी रोड
दोराबजी चौकातून अरोरा टॉवरकडे जाण्याऐवजी वाहनचालकांनी दोराबजी ते ब्लू नाईलसमोरून इच्छितस्थळी जावे. तारापोर रोड हॉटेल ग्रॅण्डकडून अरोरा टॉवर चौकाकडे वाहनास बंदी असून त्याऐवजी बँक हाऊस-तीन तोफा चौक या मार्गाचा वापर करावा. महात्मा गांधी रोडवरील हॉटेल नाझ चौकातून अरोरा टॉवर चौक वाहतूक बंद, नाझ चौकातून डावीकडे वळून बाटलीवाला बगीचामार्गे जावे. तीन तोफा चौक व सिल्व्हर ज्युबिली चौक मोटर्सकडून अरोरा टॉवरकडे येण्यास रोड वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहे. नागरिकांनी वाहने तारापोर रोड, ईस्ट स्ट्रीट येथे पार्क करावी.