डॉ. अंजली कोहकडे यांना कोरोना योद्धा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:30+5:302021-01-13T04:22:30+5:30
______________ विद्यार्थ्यांसाठी फिटनेस महासंग्राम पुणे : लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांना नव्याने व्यायाम सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फिटनेस महासंग्राम ...
______________
विद्यार्थ्यांसाठी फिटनेस महासंग्राम
पुणे : लॉकडाऊन नंतर विद्यार्थ्यांना नव्याने व्यायाम सुरु करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने फिटनेस महासंग्राम या स्पर्धात्मक उपक्रमाचे १४ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन केले आहे. ही माहिती क्रीडा अधिकारी शिल्पा चाबुकस्वार यांनी दिली.
सोमवारी (दि.११) रोजी पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी निलेश खानापुरकर, संदीप चोगटू उपस्थित होते.
चाबुकस्वार म्हणाल्या, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या मान्यतेने एक्सएल रुट्स आणि पेंटा प्ले यांच्या वतीने ऑनलाईन फिटनेस महासंग्रामाचे आयोजन करण्यात आले आहे. ८ ते १८ या वयोगटातील विद्यार्थ्यांना यामध्ये भाग घेता येईल. वेगवेगळ्या दिलेल्या व्यायामांच्या प्रकारावर ही स्पर्धा असणार आहे. प्राथमिक, उपांत्य आणि अंतिम फेरी असे स्वरूप असणार आहे. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांना देखील भाग घेता येणार आहे. www.fitnessmahasangram.com या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले.
---
महाविद्यालये सुरू करण्याची मागणी
पुणे : कोरोनामुळे राज्यातील शाळा, महाविद्यालये बंद ठेवली आहेत. परंतु, सर्व क्षेत्रे खुली होत असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नयेत, म्हणून त्वरित सुरू करावीत, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (यादव गट) राष्ट्रीय युवा नेते गंगाधर यादव यांनी केली आहे.