डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: नागोरी, खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2018 02:45 AM2018-08-23T02:45:48+5:302018-08-23T02:46:10+5:30

दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३मध्ये अटक करण्यात आली होती.

Dr. Dabholkar murder case: Nagori, Khandelwal's closure report pending | डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: नागोरी, खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: नागोरी, खंडेलवालचा क्लोजर रिपोर्ट प्रलंबित

Next

पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरखूनप्रकरणात संशयित म्हणून अटक करण्यात आलेले आरोपी मनीष नागोरी व विकास खंडेलवाल यांच्याविरुद्ध न्यायालयात दाखल करण्यात आलेला खटला बंद करण्यात यावा, यासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जावर अद्याप काहीच कार्यवाही करण्यात आलेली नाही.
दोघांनाही या प्रकरणात डिसेंबर २०१३मध्ये अटक करण्यात आली होती. तपासात काही ठोस पुरावे न मिळाल्याने या प्रकरणी ९० दिवसांत दोषारोपत्र दाखल झाले नव्हते. त्यामुळे त्यांची सुटका करण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांनी खटला बंद करण्यासंदर्भातील अहवाल (क्लोजर रिपोर्ट) न्यायालयात सादर करावा, असा विनंतीअर्ज आरोपींचे वकील अ‍ॅड. बी. ए. अलूर यांनी सहा महिन्यांपूर्वी दाखल केला होता.
या संदर्भात तपास अधिकारी व सरकारी वकिलांनी त्यांचे म्हणणे न्यायालयासमोर मांडावे, असे आदेश त्या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. बी. गुळवे-पाटील यांनी दिले होते. मात्र, अद्याप त्याबाबत काही निर्णय झालेला नाही. नागोरी याने अनेकांना बेकायदेशीररीत्या देशी बनावटीच्या पिस्तुलांची विक्री केली होती. डॉ. दाभोलकर यांचा खून करणाऱ्यांनादेखील पिस्तुलाची विक्री केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. नागोरी व खंडेलवाल यांना पुणे विद्यापीठाच्या आवारात रखवालदाराच्या खूनप्रकरणात पोलिसांनी अटक केली होती. डॉ. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणारा आरोपी पकडण्यात आल्याचा दावा सध्या सीबीआय करीत आहेत. या प्रकरणात नागोरी आणि खंडेलवाल यांचा काही सहभाग नसल्याचे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या पार्श्वभूमीवर, क्लोजर रिपोर्ट सादर करणे अपेक्षित आहे.

नुकसानभरपाईचा दावा करणार
नागोरी आणि खंडेलवाल यांचा डॉ. दाभोलकर खूनप्रकरणात थेट सहभाग नसल्याचे ठोस पुरावे अद्याप मिळालेले नाहीत; त्यामुळे दोघांचा या प्रकरणात काय रोल होता, हे स्पष्ट झालेले नाही.
असे असतानाही त्यांना अटक करण्यात आली होती; त्यामुळे या प्रकरणी झालेल्या मनस्तापाबाबत नुकसानभरपाई मिळावी म्हणून उच्च न्यायालयात दावा दाखल करण्यात येणार आहे, असे अ‍ॅड. अलूर यांनी सांगितेल.

Web Title: Dr. Dabholkar murder case: Nagori, Khandelwal's closure report pending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.