डॉ. मधुसूदन घाणेकर यांची अध्यक्षपदी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:12 AM2021-02-25T04:12:04+5:302021-02-25T04:12:04+5:30

ज्येष्ठ कवी डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्यासह लघुपट, अनुबोधपट, शिळवादन, ...

Dr. Election of Madhusudan Ghanekar as President | डॉ. मधुसूदन घाणेकर यांची अध्यक्षपदी निवड

डॉ. मधुसूदन घाणेकर यांची अध्यक्षपदी निवड

googlenewsNext

ज्येष्ठ कवी डॉ. मधुसूदन घाणेकर यांनी अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. साहित्यासह लघुपट, अनुबोधपट, शिळवादन, गायन, संपादन, ज्योतिषशास्त्र एकपात्री कार्यक्रम आदी विविध क्षेत्रात त्यांच्या नावावर २५० विश्वविक्रम आहेत.

--

पंतप्रधान साहाय्य निधीस भरीव रकमेचा धनादेश

पुणे : भारतीय रिजर्व बँकेतून अधिकारी पदावरून निवृत्त झालेल्या सुहासिनी बिवलकर या ७५ वर्षीय महिलेने वाढदिवसाच्या दिवशी भरीव रकमेचा धनादेश पंतप्रधान साहाय्य निधीस दिला आहे. या धनादेश बिवलकरांचे स्नेही सुरेश परांजपे यांच्यामार्फत नगरसेविका गायत्री खडके यांच्याकडे सुपूर्त केला आहे. यावेळी उल्हास पाठक, किरण जगदाळे उपस्थित होते. त्यादिवशी समाजातील गरजू लोकांना आठवडाभर पुरेल एवढा शिधा व खाऊचे वाटप केले.

---

‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ नाटकातून करमणुकीचा आनंद : दामले

पुणे : रोजच्या जीवनात सर्वसामान्य माणूस खूप विचार करत जगत असतो. एका लग्नाची दुसरी गोष्ट असे नाट्यप्रयोग काही काळ का होईना निखळ करमणुकीचा आनंद नक्कीच देतात, असे मत अभिनेते प्रशांत दामले यांनी व्यक्त केले. बालगंधर्व रंगमंदिर येथे आप्त आपटे सेवा कार्यसमितीतर्फे एका लग्नाची दुसरी गोष्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित केला होता. अभय आणि सचिन आपटे यांच्या हस्ते नाटकातील प्रमुख भूमिका साकारणारे कलाकार प्रशांत दामले आणि कविता लाड मेढेकर यांचा सत्कार केला. आप्त सेवा कार्यसमितीचे संस्थापक वसंत आपटे, सचिव अनिल आपटे, समितीचे ज्येष्ठ कार्यकर्ते रवींद्र आपटे उपस्थित होते.

Web Title: Dr. Election of Madhusudan Ghanekar as President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.