डॉ. गंगाखेडकर यांना 'एआयटी'तर्फे जीवनगौरव पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:55+5:302021-02-24T04:10:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) पुणेच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एआयटी) पुणेच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त दिला जाणारा जीवनगौरव पुरस्कार भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) साथरोग विभागाचे माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर यांना जाहीर झाला आहे. यशस्वी उद्योजक पुरस्कार एम तत्त्व आणि सिम्बो. एआय कंपनीचे सहसंस्थापक बलजित सिंग आणि सहसंस्थापक प्रवीण प्रकाश यांना जाहीर झाला आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते येत्या गुरुवारी (दि. २४) दिघी येथील एआयटीच्या प्रांगणात पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे. डॉ. रमण गंगाखेडकर भारतीय साथरोग विशेषज्ञ आहेत. एम तत्त्व ही कंपनी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आरोग्य क्षेत्रात काम करते, अशी माहिती ‘एआयटी’चे संचालक ब्रिगेडियर अभय भट यांनी दिली.