डॉ. माया पवार यांचा ग्राहक पंचायतीच्या वतीने सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:25+5:302021-09-25T04:10:25+5:30

केंदूर : केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोनाच्या कालावधीत नियमित लसीकरण, दैनिक आरोग्य उपचार, कोविड सेंटरची व्यवस्थापन, ...

Dr. Maya Pawar honored on behalf of Consumer Panchayat | डॉ. माया पवार यांचा ग्राहक पंचायतीच्या वतीने सन्मान

डॉ. माया पवार यांचा ग्राहक पंचायतीच्या वतीने सन्मान

Next

केंदूर : केंदूर (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राने कोरोनाच्या कालावधीत नियमित लसीकरण, दैनिक आरोग्य उपचार, कोविड सेंटरची व्यवस्थापन, नियोजनबद्ध कोविड लसीकरण आदी उल्लेखनीय अनेक कामाबद्दल केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. माया पवार यांचा अखिल भारतीय ग्राहक पंचायत शिरूर तालुक्याच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला.

यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र प्रांत महसूल समिती प्रमुख रमेश टाकळकर, शिरूर तालुका अध्यक्ष देवेंद्र जगताप, सचिव संतोष शेळके, कार्यकारिणी सदस्य पंडित मासळकर, पर्वतराज नानगे, अशोक मोरे, दत्ता ननवरे आदी उपस्थित होते. नुकतेच शिरूर तालुक्यातील ८ प्राथमिक आरोग्य केंद्र ४२ उपकेंद्र ३ ग्रामीण रुग्णालय यांचे ग्राहक पंचायतीच्या वतीने पाहणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ६ उपकेंद्र, १४ प्रमुख गावे, ५४ हजार लोकसंख्या पैकी ३६ हजार नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहेत. केंदूर प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत अपुरे मनुष्यबळ असतानाही एक कोविड उपचार सेंटरवरील व्यवस्थापन चालू असून सहा उपकेंद्रामार्फत आरोग्य सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न माया पवार करत असल्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी आरोग्य कर्मचारी संजय पहाड शिल्पा उमाप कोमल पवार रोहिणी खंडे आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : केंदूर आरोग्य केंद्राच्या अधिकारी डॉ. माया पवार यांचा ग्राहक पंचायत यांच्या वतीने सन्मान करताना उपस्थित मान्यवर.

Web Title: Dr. Maya Pawar honored on behalf of Consumer Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.