डॉ. कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त मोबाईल बँक उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:10 AM2021-09-25T04:10:03+5:302021-09-25T04:10:03+5:30

या उपक्रमाच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो. शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्याप्रतिष्ठान महाविद्यालय, ...

Dr. Mobile bank activities on the occasion of Karmaveer Anna's birthday | डॉ. कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त मोबाईल बँक उपक्रम

डॉ. कर्मवीर अण्णांच्या जयंतीनिमित्त मोबाईल बँक उपक्रम

Next

या उपक्रमाच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो. शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, विद्याप्रतिष्ठान महाविद्यालय, राधेश्याम एन. आगरवाल टेक विद्यालय, शाहू हायस्कूल, बारामती व इतर विद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर जयंती साजरी केली जाते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादित स्वरूपात हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कर्मवीर अण्णांनी गोरगरीबवर्गातील बहुजनांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. याचीच जाणीव ठेवून सध्या कोविडमुळे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. या ऑनलाईन शिक्षणापासून गरिबीमुळे दूर असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल बँक उपक्रम विद्यालयाने राबवला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून या गरीब विद्यार्थ्यांना शाळेमार्फत अभ्यासासाठी मोबाईल दिला जातो. समाजातील काही दानशूर पालकांनी हे मोबाईल विद्यालयाला भेट म्हणून दिले आहेत. अजून काही इच्छुक पालकांनी विद्यालयाच्या या उपक्रमास मदत करण्याचे आवाहन विद्यालयाचे प्रा. झाकीर शेख यांनी केले.

या उपक्रमाची सुरुवात कर्मवीर जयंतीदिनी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य व स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सदाशिव सातव व दिलीप ढवाण यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी कर्मवीरांच्या पुतळ्यास व प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमासाठी स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सदाशिव सातव, दिलीप ढवाण पाटील, संयुक्त कर्मवीर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष व तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य चंद्रशेखर मुरूमकर, जयंती समितीचे समन्वयक आगवणे, विद्यालयाचे प्रा. झाकीर शेख, उपमुख्याध्यापक कल्याण देवडे, पर्यवेक्षक जाधव रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य अर्जुन मलगुंडे, शिक्षक नेते गणपतराव तावरे, ज्युनिअर विभागप्रमुख आनंदराव करे, एम. सी. व्ही. सी. विभागप्रमुख सुधीर जाधव उपस्थित होते.

Web Title: Dr. Mobile bank activities on the occasion of Karmaveer Anna's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.