डॉ. नायडू रुग्णालयातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:14 AM2021-03-09T04:14:36+5:302021-03-09T04:14:36+5:30

पुणे : पुणे महापालिकेच्या डॉ़ नायडू संसर्गजन्य आजारांचे रूग्णालयाचा कोरोना आपत्तीतील, रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण शहरातील इतर रूग्णालयांच्या तुलनेत ...

Dr. Naidu Hospital has a recovery rate of 98.46 per cent | डॉ. नायडू रुग्णालयातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४६ टक्के

डॉ. नायडू रुग्णालयातील रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.४६ टक्के

Next

पुणे : पुणे महापालिकेच्या डॉ़ नायडू संसर्गजन्य आजारांचे रूग्णालयाचा कोरोना आपत्तीतील, रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण शहरातील इतर रूग्णालयांच्या तुलनेत सर्वाधिक असून, येथून दाखल रूग्णांपैकी ९८़४६ टक्के रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत़

प्लेगच्या साथीमध्ये साधारणत: शंभर वर्षापूर्वी सुरू करण्यात आलेले, पुण्यातील डॉ़ नायडू संसर्गजन्य आजाराच्या रूग्णालयात फेब्रुवारी, २० मध्ये सर्वात प्रथम कोरोनाबाधित रूग्णांसाठी स्वतंत्र कक्ष करण्यात आला़ परदेशातून आलेल्या रूग्णांची आरटीपीसीआर तपासणी करून, तपासणी अहवाल येईपर्यंत येथील कक्षात त्यांना ठेवण्यात येत होते़ ९ मार्च, २० मध्ये येथे दाखल असलेल्या पहिल्या रूग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला़ त्यादिवसापासून या रूग्णालयात व महापालिकेच्या अन्य रूग्णालयांसह शहरातील ९४ खाजगी रूग्णालयांमध्ये हजारो रूग्ण दाखल झाले़

परंतु, पहिल्या पासून दुर्लक्षित राहिलेल्या व उपचारासाठी दाखल होण्यास नकार देणाºया याच डॉ़ नायडू रूग्णालयात आजपर्यंत ५ हजार ३५० कोरोनाबाधित रूग्ण दाखल झाले़ यापैकी ५ हजार २६८ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले असून, हे प्रमाण ९८़४६ टक्के इतके आहे़ तर येथे दाखल रूग्णांपैकी की ज्यांची प्रकृती अत्यंत खालावली गेली व इतर रूग्णालयातून ज्यांना येथे उपचारासाठी पाठविण्यात आले होते़ अशांपैकी २२९ जणांचा मृत्यू झाला़

-------------------

कोरोना आपत्तीत मिळाले आयसीयू

शंभर वर्षांचा इतिहास असलेल्या डॉ़नायडू रूग्णालयात सन २०२० पर्यंत आयसीयू (अतिदक्षता विभाग) विभाग नव्हता़ मात्र कोरोना आपत्तीत या रूग्णालयात आयसीयूसह, व्हेटिलेटरही आले़ तसेच आॅक्सिजन बेड, स्वतंत्र आॅक्सिजन पुरवठा यंत्रणा आदी सुविधाही येथे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापौर निधीतून १ कोटी रूपये देऊन उपलब्ध करून दिल्या़

-------------------------

डॉ़नायडू रूग्णालयाचा फोटो वापरणे़

Web Title: Dr. Naidu Hospital has a recovery rate of 98.46 per cent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.