अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने समुपदेशन करण्याची डाॅ.निलम गोऱ्हे यांची सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2018 06:06 PM2018-07-29T18:06:35+5:302018-07-29T18:08:26+5:30
कात्रज येथील मदरशात लैंगिक अत्याचार झालेल्या मुलांचे तातडीने मेडिकल अाणि समुपदेशन करण्याच्या सूचना डाॅ. निलम गोऱ्हे यांनी केल्या अाहेत.
पुणे : कात्रज येथील मदरशात लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस अाली अाहे. ही घटना समजताच शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी तातडीने पुण्यातील स्त्री अाधार केंद्राच्या प्रतिनिधींना पाठवून मुलांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अाज रविवारी सुटी असली तरी गोऱ्हे यांनी महिला व बाल विकास आयुक्त विपीन शर्मा यांना निवेदन देऊन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ३३ मुलांचे मेडिकल आणि समुपदेशन करण्याची सूचना केली.
कात्रज येथील मदरशात लहान मुलांवर लैंगिक अत्याचार झाला असल्याचा प्रकार शुक्रवारी समाेर अाला. या घटनेची दखल घेत डाॅ. निलम गोऱ्हे यांनी तातडीने पुण्यातील स्त्री आधार केंद्र संस्थेतील प्रतिनिधींना पाठवून मुलांचे समुपदेशन करण्याच्या सूचना दिल्या. परंतु स्त्री अाधार केंद्राचे प्रतिनिधी तेथे पाेहाेचल्यावर मुले सतत झाेपत असल्याचे त्यांच्या निदर्शनास अाले. या मुलांना कुपाेषणामुळे झाेप येत अाहे की त्यांना अमली पदार्थ दिले अाहेत का, हे शाेधणे अावश्यक अाहे हे लक्षात येताच गोऱ्हे यांनी महिला व बाल विकास अायुक्त विपीन शर्मा यांच्याशी संपर्क शाधला. तसेच त्यांना निवेदन देत रविवारी शासकीय सुटी असली तरी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने ३३ मुलांचे मेडिकल आणि समुपदेशन करण्याची सूचना केली. यावर अायुक्त विपीन शर्मा यांनी महिला व बाल विकास विभागाची टीम रविवारी सुद्धा या मुलांचे मेडिकल अाणि समुपदेशन करेल असे सांगितले. तसेच गोऱ्हे यांनी पाेलिस अायुक्त रश्मी शुक्ला यांना ही निवेदन देऊन अाराेपींवर कारवाई करण्याची विनंती केली अाहे.