सह्याद्रीतील बांबूच्या नव्या प्रजातीला डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 2, 2021 06:42 PM2021-05-02T18:42:05+5:302021-05-02T18:42:40+5:30

सह्याद्रीमधील वनस्पती वैभवात या बांबूच्या प्रजातींची भर

Dr. new species of bamboo in the Sahyadri. Name of Madhav Gadgil | सह्याद्रीतील बांबूच्या नव्या प्रजातीला डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव

सह्याद्रीतील बांबूच्या नव्या प्रजातीला डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव

googlenewsNext
ठळक मुद्देअनेक वर्षांच्या निरीक्षणामुळे वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील हा गुंता सोडवण्यात या संशोधकांना यश

पुणे: सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये बांबूची ‘सुडोओक्सिनानथेरा माधवी’ ही नवी प्रजाती आढळून आली आहे. पुण्यातील वनस्पती संशोधकांनी ती शोधून काढली आहे. या वनस्पतीला निसर्ग संवर्धनाचे काम करणारे ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचे नाव दिले आहे. नुकतेच आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत याबाबतचा प्रबंध प्रसिध्द झाला आहे.

पानशेत जवळील शिरकोली जंगलात ही वनस्पती सापडली आहे. ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ. पी. तेताली, केरळच्या वन संशोधन केंद्राचे डॉ. मुरलीधरन, आघारकर संशोधन संस्तेतील शास्त्रम डॉ. मंदार दातार, डॉ. सुजाता तेताली, सारंग बोकील, डॉ. रितेश चौधरी यांनी या वनस्पतीचा शोध लावला आहे. वास्तविक पाहता फुलांशिवाय बांबूची ओळख करणे तसे सोपे काम नव्हते. कारण बांबूला आयुष्यात एकदाच फुले येतात आणि ते ही काहींना ४० ते ६० वर्षानंतर आणि बांबूचे बेट नंतर मरते. डॉ. पी. तेताली यांच्या अनेक वर्षांच्या निरीक्षणामुळे आणि नुकतेच याची फुलं मिळाल्यामुळे वनस्पती वर्गीकरण शास्त्रातील हा गुंता सोडविण्यात या संशोधकांना यश मिळाले आहे. मेस सुडोओक्सिनानतेरा माधवी’ आणि माणगा (सुडोओक्सिनानथेरा स्टोकसी) यातील मह्त्वपूर्ण फरक देखील या संशोधनातून उघड झाला आहे. न्यूझीलंडच्या ‘फायटोटॉक्सा’ या आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेत नुकताच हा शोधनिबंध प्रसिध्द झाला आहे. सह्याद्रीमधील वनस्पती वैभवात या बांबूच्या प्रजातीने भर घातली असून जैवविविधतेमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. सह्याद्री जंगलांत याला मेस/मेष या नावाने ओळखले जाते. अत्यंत उपयुक्त असलेली ही बांबूची प्रजात स्थानिक लोक गेली अनेक वर्षे विविध गोष्टींसाठी  वापर करत आहेत.

मेस म्हणजे मजबूत बांबू

मेस या बांबूचा वापर बांधकामात केला जातो. कारण हा बांबू खूप मजबूज असतो. घरे, फर्निचर बनविण्यासाठीही याचा वापर होतो. पुणे आणि सातारा जिल्ह्यातील जंगलात हा बांबू दिसून येतो.

Web Title: Dr. new species of bamboo in the Sahyadri. Name of Madhav Gadgil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.