डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:23 AM2021-01-13T04:23:32+5:302021-01-13T04:23:32+5:30

भाविका शर्मा, बिशना चंद्रन यांचा प्रथम क्रमांक पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’च्या वतीने राष्ट्रीय ...

Dr. Patangrao Kadam announces results of National Eloquence Competition | डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

डॉ. पतंगराव कदम राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर

Next

भाविका शर्मा, बिशना चंद्रन यांचा प्रथम क्रमांक

पुणे : भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’च्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील ऑनलाईन ‘डॉ. पतंगराव कदम वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन ९ जानेवारी रोजी आयएमईडी, एरंडवणे येथे केले होते. या स्पर्धेत भाविका शर्मा, बिशना चंद्रन यांनी विभागून प्रथम क्रमांक पटकावला. क्षितिजा पवार, अपूर्वा सिंग यांनी द्वितीय तर संकेत पाटील, गायत्री गायधनी यांचा तृतीय क्रमांक आला आहे. श्रेया वर्मा यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.

भारती विद्यापीठ विश्‍वविद्यालयाच्या व्यवस्थापनशास्त्र शाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर यांनी स्पर्धेचे उदघाटन केले. देशभरातून १३१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन गटात ही स्पर्धा झाली.

‘गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन : डॉ. पतंगराव कदम’, ‘कोविड १९ नंतरची जागतिक परिस्थिती’, ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२०’, ‘एकविसाव्या शतकातील सांस्कृतिक परिवर्तन’, ‘डिजिटायझेशनच्या युगाचे फायदे तोटे’, ‘माझ्या दृष्टीकोणातून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास’, ‘तरुण आणि उद्योजकता’, ‘भारतीय संविधान : लोकशाहीच्या यशाचे गुपित’ हे स्पर्धेचे विषय होते. डॉ. जयंत ओक, डॉ. भारतभूषण सांख्ये, विवेक रणखांबे, डॉ. शरद जोशी यांनी परीक्षण केले. डॉ. हेमचंद्र पाडळीकर, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सचिन आयरेकर, डॉ. विजय फाळके, सुजाता मलिक, प्रतिमा गुंड यांनी संयोजन केले .

Web Title: Dr. Patangrao Kadam announces results of National Eloquence Competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.