डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मिळ लघुपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:11 AM2021-04-14T04:11:27+5:302021-04-14T04:11:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर १९६८ साली तयार करण्यात आलेल्या ...

Dr. Rare short film on Babasaheb Ambedkar | डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मिळ लघुपट

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील दुर्मिळ लघुपट

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर १९६८ साली तयार करण्यात आलेल्या दुर्मिळ लघुपटाची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात नुकतीच भर पडली आहे. ‘महापुरुष डॉ. आंबेडकर’ या नावाने तयार करण्यात आलेल्या या लघुपटाची निर्मिती महाराष्ट्र शासनाच्या प्रसिद्धी संचालनालयातर्फे १९६८ च्या जुलै महिन्यात करण्यात आली होती.

'व्हटकर प्रॉडक्शन्स' या बॅनरखाली निर्मित करण्यात आलेल्या या लघुपटाचे दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. सुमारे १८ मिनिटांच्या या लघुपटाला सुप्रसिद्ध संगीतकार दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले होते. सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते डेव्हिड अब्राहम यांनी या लघुपटाचे निवेदन केले होते. नामदेव व्हटकर हे एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीतील नावाजलेले अभिनेते आणि दिग्दर्शक होते. १९५७ साली अभिनेत्री सुलोचना यांची प्रमुख भूमिका असलेल्या 'आहेर' या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन नामदेव व्हटकर यांनी केले होते. 'मुलगा' या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन, 'घरधनी' या चित्रपटाचे कथालेखन त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्यासमवेत केले होते.

प्रकाश मगदूम म्हणाले की, लघुपटात डॉ. आंबेडकर यांच्या जीवनातील प्रमुख घटनांवर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. त्यांच्या अखेरच्या काळातील काही घटनांचे 'फुटेज' पाहायला मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपूर येथे स्वीकारललेला बुद्ध धर्म तसेच त्यांनी केलेला नेपाळ दौरा, याशिवाय मुंबई येथील दादर चौपाटी येथे आंबेडकर यांच्या निघालेल्या अंत्ययात्रेचे ठळक चित्रीकरण या लघुपटात पाहायला मिळते. या लघुपटाचे छायाचित्रण मधुकर खामकर यांनी केले असून, जी. जी. पाटील यांनी संकलन केले आहे. वास्तविक हा लघुपट मुळात ३५ एमएमच्या स्वरूपात होता. परंतु त्याची १६ एमएम स्वरूपातील प्रिंट आम्हाला मिळाली आहे. या प्रिंटचे लवकरच डिजिटायझेशन करण्यात येईल.

Web Title: Dr. Rare short film on Babasaheb Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.