डॉ. राऊत यांना शिवनेरी भूषण पुरस्कार प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:17 AM2021-02-21T04:17:24+5:302021-02-21T04:17:24+5:30
खोडद : पुणे जिल्ह्यात जागतिक कीर्तीचे सर्पदंश व विषबाधातज्ज्ञ म्हणून नावाजलेले डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांना ...
खोडद : पुणे जिल्ह्यात जागतिक कीर्तीचे सर्पदंश व विषबाधातज्ज्ञ म्हणून नावाजलेले डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांना किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना 'शिवनेरी भूषण' पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांच्या कार्याचे कौतुक करून हे कार्य वेगळे असून त्यांची गरज समाजाला आहे. यावेळी त्यांनी मुंबईला येण्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. राऊत दाम्पत्याचे कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा आदर्श आहे. सर्पदंश झालेल्या अनेकांचा जीव वाचवून त्यांनी अनेकांचे संसार वाचवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन याबाबत सरकारी स्तरावर त्यांचा गौरव केला जाईल.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ. अमोल कोल्हे, संभाजीराजे भोसले, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजाराम देशमुख, आयुक्त सौरभ राव, डॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.
डॉ. राऊत हे हृदयविकार, मधुमेह आणि किडनीरोगतज्ज्ञ असूनही या परिसराची गरज ओळखून मागील ३० वर्षांपासून सर्पदंश व विषबाधा झालेल्या गंभीर व अत्यवस्थ रुग्णांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपचार करत आहेत. डॉ. राऊत यांनी केलेल्या सर्पदंश उपचाराची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन कौतुक करण्यात आले आहे. वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
--
संपूर्ण देशातील शिवभक्तांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर यावर्षी पहिल्यांदाच पुरस्कार वितरण झाले आहे. शिवजयंतीच्या दिवशी आम्हाला साक्षात किल्ले शिवनेरीवर शिवनेर भूषण पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझे आई वडील, पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण देणारे शिक्षक, पद्मभूषण डॉ. जाल व डॉ. मेहरू मेहता, लायन्स क्लब ऑफ जुन्नरचे सर्व सदस्य, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स नागरिक यांचा ऋणी आहे.
- डॉ. सदानंद राऊत, शिवनेरी भूषण पुरस्कार प्राप्त (सर्पदंशतज्ज्ञ, नारायणगाव)
--
फोटो : २० राऊत यांना शिवनेरी पुरस्कार
खोडद : पुणे जिल्ह्यात जागतिक कीर्तीचे सर्पदंश व विषबाधा तज्ज्ञ म्हणून नावाजलेले डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांना किल्ले शिवनेरी परिसर विकास मंडळाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांना 'शिवनेरी भूषण' पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांच्या कार्याचे कौतुक करून हे कार्य वेगळे असून त्यांची गरज समाजाला आहे. यावेळी त्यांनी मुंबईला येण्याचे निमंत्रणही त्यांना दिले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, डॉ. राऊत दाम्पत्याचे कार्य हे कौतुकास्पद आहे. त्यांचा आजपर्यंतचा प्रवास हा आदर्श आहे. सर्पदंश झालेल्या अनेकांचा जीव वाचवून त्यांनी अनेकांचे संसार वाचवले आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन याबाबत सरकारी स्तरावर त्यांचा गौरव केला जाईल.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार डॉ.अमोल कोल्हे, संभाजीराजे भोसले, आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ.राजाराम देशमुख, आयुक्त सौरभ राव, डॉ. संदेश राऊत आदी उपस्थित होते.
डॉ. राऊत हे हृदयविकार, मधुमेह आणि किडनीरोग तज्ज्ञ असूनही या परिसराची गरज ओळखून मागील ३० वर्षांपासून सर्पदंश व विषबाधा झालेल्या गंभीर व अत्यवस्थ रुग्णांवर अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत उपचार करत आहेत. डॉ. राऊत यांनी केलेल्या सर्पदंश उपचाराची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेऊन कौतुक करण्यात आले आहे. वैद्यकीय व सामाजिक कार्याबद्दल त्यांचा अनेक पुरस्कारांनी गौरव करण्यात आला आहे.
--
संपूर्ण देशातील शिवभक्तांचे तीर्थक्षेत्र असलेल्या शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीवर यावर्षी पहिल्यांदाच पुरस्कार वितरण झाले आहे. शिवजयंतीच्या दिवशी आम्हांला साक्षात किल्ले शिवनेरीवर शिवनेर भूषण पुरस्कार मिळाला ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल मी माझे आई वडील, पहिली ते पदवीपर्यंत शिक्षण देणारे शिक्षक, पद्मभूषण डॉ. जाल व डॉ. मेहरू मेहता, लायन्स क्लब ऑफ जुन्नरचे सर्व सदस्य, जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील सर्व डॉक्टर्स नागरिक यांचा ऋणी आहे.
- डॉ. सदानंद राऊत, शिवनेरी भूषण पुरस्कारप्राप्त (सर्पदंशतज्ज्ञ, नारायणगाव)
--
फोटो : २०खोडद डॉ. राऊत