डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 04:05 AM2017-08-01T04:05:49+5:302017-08-01T04:05:49+5:30
सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून सोमवारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
पुणे : सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. शां. ब. मुजुमदार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतील मान्यवरांकडून सोमवारी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. मुजुमदार यांनी ८३व्या वर्षात पदार्पण केले आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, निवृत्त एअर चीफ मार्शल भूषण गोखले, ज्येष्ठ उद्योजक राहुलकुमार बजाज, ज्येष्ठ अस्थिरोगतज्ज्ञ डॉ. के. एच. संचेती, माजी खासदार भरतकुमार राऊत, आमदार माधुरी मिसाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे, सामाजिक कार्यकर्ते संजय नहार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवय व्यक्तींनी मुजुमदार यांना वाढविसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
मुजुमदार यांच्या वाढदिवसनिमित्त सिम्बायोसिसमध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त सिम्बायोसिसमधील सर्व परदेशी विद्यार्थ्यांनी आपल्या राष्ट्राचे ध्वजारोहण केले. त्याचबरोबर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन केले. विद्यापीठातील शिक्षण घेणाºया विविध देशांमधील विद्यार्थ्यांनी आपल्या देशाचे राष्ट्रगीत गायले. सकाळी साडेआठपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शुभेच्छा देणाºयांची रीघ
लागली होती.
विद्यार्थ्यांनी या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.