Pune Porsche Accident News रक्ताचे नमुने बदलण्यासाठी डॉ. श्रीहरी हलनोरने घेतले ३ लाख; पुणे पोलिसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2024 11:29 AM2024-05-27T11:29:22+5:302024-05-27T11:30:01+5:30
Pune Porsche Accident News ललित पाटील प्रकरणानंतर अग्रवालच्या फेरफारच्या घटनेने ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबरलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित
पुणे: पुणे शहर गुन्हे शाखेने सोमवारी सकाळी ससून रुग्णालयातील डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हलनोर या दोघा डॉक्टरांना कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक केली आहे. श्रीहरी हलनोरने रक्ताचं नुमने बदलण्यासाठी ३ लाखांची लाच घेतल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा अपघातापूर्वी दोन पबमध्ये गेला होता आणि त्याने मद्यपान केले होते. पोलिसांनी एका पबचे सीसीटीव्ही फुटेजही जप्त केले आहे. एका पबमध्ये मुलाने ४८ हजार रुपयांचे बिल दिले. ही हेराफेरी उघडकीस आल्यावर पोलिस रक्ताच्या नमुन्याच्या अहवालाची वाट पाहत होते. छेडछाडीची कोणतीही शक्यता टाळण्यासाठी पोलिसांनी मुलाचे दोन नमुने घेतले होते.
कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा ब्लड रिपोर्ट बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील फॉरेन्सीक विभागाचे प्रमुख डॉ अजय तावरे आणि डॉ श्रीहरी हर्सूल या दोघांना गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी रात्री उशीरा अटक केलीय. ड्रग तस्कर ललीत पाटील प्रकरणात देखील ससून रुणालयातील डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता दोन डॉक्टरांना या प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्यामुळे ससून रुग्णालयाच्या भ्रष्टाचाराने बरबरलेल्या प्रशासनावर अनेक सवाल उपस्थित होऊ लागले आहेत. अशातच श्रीहरी हलनोरने रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ३ लाखांची लाच घेतल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले आहे.