पाणी गुणवत्ता माहिती व्यवस्थापन प्रणालीच्या राज्य समन्वयपदी डी आर वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:09 AM2020-12-25T04:09:47+5:302020-12-25T04:09:47+5:30
शासनाने संचालक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील वर्ग १ चे अधिकारी धोंडीराम रघुनाथ वारे यांची निवड केली आहे. धोंडिराम ...
शासनाने संचालक, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेतील वर्ग १ चे अधिकारी धोंडीराम रघुनाथ वारे यांची निवड केली आहे. धोंडिराम वारे हे मागील १६ वर्षा पासुन पाणी पुरवठा व स्वच्छ्ता विभागाच्या भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणे मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी कोंकण, अमरावती, नाशिक विभागात काम केले आहे. त्या अगोदर ते हिन्दुस्थान एन्टी बायोटीक्स, पिंपरी येथे सांयटिफिक आधिकारी म्हणुन कार्यरत होते. वारे हे जुन्नर तालुक्यातील घाटघर (नाणेघाट) या अतिशय दुर्गम भागातील आहेत. केंद्राने राज्याचे पाणी गुणवत्ते बाबतची महत्वाची जबाबदारी दिली आहे.
प्रकल्प जलजीवन मिशन अंतगर्त कार्यक्रमामध्ये ग्रामीण जनतेला शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे उदिष्ट आहे. यासाठी राज्यातील सर्व सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची तपासणी व सर्वेक्षण करणे अपेक्षित आहे.
२४ नारायणगाव