डॉ. दाभोलकर हत्याप्रकरणी सूत्रधारास कधी पकडणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:14 AM2021-08-14T04:14:46+5:302021-08-14T04:14:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे होत आहेत. त्या प्रकरणातील संशयिताना पडकण्यात आलं. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला आठ वर्षे होत आहेत. त्या प्रकरणातील संशयिताना पडकण्यात आलं. मात्र, अद्याप सूत्रधार कोण आहे. हे समजू शकले नाही. त्यांना कधी पकडणार? असा सवाल अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ. हमीद दाभोलकर यांनी शासनाला केला आहे. तसेच सीबीआयने हा खटला न्यायालयात लवकरात लवकर सुरू करावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूस २० ऑगस्ट २०२१ ला आठ वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपी डॉ. वीरेंद्र तावडेंना २०१६ साली, २०१८ मध्ये शरद कळसकर, सचिन अंदुरे, तर २०१९ मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. तर अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयितांच्या विरोधात अद्याप आरोपपत्र दाखल करण्यात आले नाही. डॉ. दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी व गौरी लंकेश यांच्या हत्येतील संशयित आरोपी समान आहेत. त्यामुळे हा विचार संपविण्याचा षडयंत्र असल्याचे स्पष्ट होत असल्याचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेस मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, श्रीपाल ललवाणी, डॉ. अरुण बुरांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
--------------