दोन दिवसांत होणार कंपनीचा मसुदा
By admin | Published: January 31, 2016 04:32 AM2016-01-31T04:32:38+5:302016-01-31T04:32:38+5:30
केंद्रातील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्याप्रमाणे महापालिका प्रशासन स्मार्ट सिटीसाठीची स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहे. कंपनीचे उद्दिष्ट, संचालक मंडळ व अध्यक्ष
पुणे : केंद्रातील अधिकाऱ्यांनी सूचना दिल्याप्रमाणे महापालिका प्रशासन स्मार्ट सिटीसाठीची स्वतंत्र कंपनी (एसपीव्ही) स्थापन करण्याच्या तयारीला लागले आहे. कंपनीचे उद्दिष्ट, संचालक मंडळ व अध्यक्ष अशा प्रकारचा हा मसुदा असेल. येत्या दोन दिवसांत मसुदा तयार करून नंतर तो सर्वसाधारण सभेच्या मान्यतेसाठी सादर केला जाईल, असे आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.
स्मार्ट सिटी योजनेत निवड केलेल्या देशातील २० शहरांच्या आयुक्तांबरोबर चर्चा करून केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने त्यांना एसपीव्हीच्या स्थापनेची तयारी करण्यास सांगितले आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वेही त्यांना देण्यात आली आहेत. त्याचा अभ्यास करून येत्या दोन दिवसांतच कंपनीचा मसुदा तयार करण्यात येईल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
मध्य प्रदेश व अन्य दोन राज्यातील स्मार्ट सिटी म्हणून निवड झालेल्या शहरांनी त्यांची एसपीव्ही स्थापन करून केंद्र सरकारला तसे कळवलेही आहे. कंपनीची रचना, अधिकार याबाबतचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार महापालिकेकडेच राहणार आहेत. मात्र स्पर्धा असेल तर त्याचे काही नियम, अटी असतातच, त्या मान्य कराव्या लागतील. स्मार्ट सिटीबाबत केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी वर्षभर सर्व संबंधितांबरोबर चर्चा करून, अभ्यास करून नियम, अटी निश्चित केल्या आहेत, असे आयुक्त म्हणाले. (प्रतिनिधी)