जिल्हा नियोजनाच्या प्रारूप आराखड्यास वेग येईल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:09 AM2021-07-20T04:09:04+5:302021-07-20T04:09:04+5:30
इंदापूर, बारामती आणि आंबेगाव तालुक्यांतील विकासकामांचे प्रमाण अधिकचे असल्याने या तालुक्यांतील विकासकामांचा वेग अधिक असणार आहे, तर इंदापूर तालुक्यातील ...
इंदापूर, बारामती आणि आंबेगाव तालुक्यांतील विकासकामांचे प्रमाण अधिकचे असल्याने या तालुक्यांतील विकासकामांचा वेग अधिक असणार आहे, तर इंदापूर तालुक्यातील मदनवाडी गावच्या विकासकामांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतल्याचे पाहायला मिळते. तालुक्यातील एकाच गावाला तब्बल १ कोटी ८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याने संपूर्ण तालुक्यात शेकडो कोटींची कामे होणार आहेत. यामुळे तालुक्यातील विकासकामांत जिल्हा नियोजनच्या माध्यमातून मोठा हातभार लाभणार आहे.
इंदापूर तालुक्यातील मदनवाडीतील राष्ट्रीय महामार्ग ५४ ते राष्ट्रीय महामार्ग ९ आणि निंबोडी रस्ता तलावाला जोडणाऱ्या रस्त्यासाठी ३० लाख, सकुंडेवस्ती शाळा ते रस्ता व वाॅर्ड ४ मधील रस्त्यासाठी १० लाख, वाॅर्ड २ मधील मदनवाडी रोड ते जिल्हा परिषद शाळा रस्त्यासाठी ७ लाख व वर्ग खोल्यांच्यासाठी साडेचार लाख रुपये, इंदिरानगर, रविंद्र ढवळे घर रस्ता व स्मशानभूमी रस्ता व अंतर्गत रस्त्यांच्यासाठी यांच्यासाठी जवळपास ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. वाॅर्ड ३ मध्ये हायमास्ट दिव्यासाठी नागरी सुविधेमधून ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
पालकमंत्री अजित पवार, राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या माध्यमातून मिळालेल्या निधीमुळे गावांचा विकास होणार असल्याने जिल्हा परिषद सदस्य हनुमंत बंडगर यांनी त्यांचे आभार व्यक्त केले.