पाणीगळतीमुळे बंधारा कोरडा
By admin | Published: April 27, 2017 04:50 AM2017-04-27T04:50:23+5:302017-04-27T04:50:23+5:30
भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीचा बांधलेला बंधारा पाणीगळतीमुळे कोरडा पडला आहे. त्यामुळे या भागातील
वडापुरी : भाटनिमगाव (ता. इंदापूर) येथील कोल्हापूर पद्धतीचा बांधलेला बंधारा पाणीगळतीमुळे कोरडा पडला आहे. त्यामुळे या भागातील शेकडो हेक्टर शेतीवरील असलेली पिके जळण्याच्या मार्गावर आहे. माणसासह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने बंधाऱ्याच्या भिंतीची उंची वाढवून त्यावर ढापे बसवण्याची मागणी वडापुरी, सुरवड, अवसरी येथील शेकडो शेतकऱ्यांनी केली आहे.
भीमा नदीपात्रालगत असलेल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी भाटनिमगाव येथे सन २००५ मध्ये नदीवर कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. मात्र, बंधारा बांधत असताना नदीपात्रातून पक्की भिंत न बांधता वरपासून खालीपर्यंत ढापे बसवण्यात आले आहे. त्या वेळी उन्हाळ्यात बंधाऱ्यातील पाणी सोडण्यावर संबंधित विभागाचे नियंत्रण होते. परंतु, काही कालावधी नंतर याकडे या विभागाचे पूर्ण दुर्लक्ष झाले व बंधारा फक्त इंदापूर व माढा तालुक्यामध्ये येण्या- जाण्यासाठी फक्त वापरला जात आहे. बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असणारी शेकडो हेक्टर क्षेत्रावरील पिके पाण्यावाचून अडचणीत आली असल्याने या भागातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील वडापुरी, सूरवड व अवसरी ही गावे पूर्वी भाटघर धरण साखळीतील धरणातून ५९ क्रमांक हा टेलचा फाटा असल्यामुळे पाटबंधारे खात्याकडून पाणी परवाना असूनदेखील पाणी मिळत नव्हते. यामुळे
मोठ्या आशेने केलेल्या या पाणी योजनांना मात्र उन्हाळ्यात पाणी मिळतच नाही. मात्र, शेतकरी आजही बारमाही पाण्याची पाणीपट्टी भरत आहेत, बंधाऱ्याला नदी पात्रातून किमान पाच मीटर अखंड भिंत बांधून त्याच्यावर ढापे बसवण्याची गरज आहे.या वेळी हनुमंत जगताप, हरिभाऊ माने, ज्ञानदेव मगर, अनिल गायकवाड, सुनील शिंदे, केशव सुर्वे, दत्तात्रय घोगरे, रावसाहेब घोगरे, कल्याण गायकवाड, बाळासाहेब जाधव, शांताराम सावंत, अर्जुन कांबळे, सुभाष जाधव, दादासाहेब जगताप, सोपान भोसले, आदर्श शिंदे, शशिकांत पवार, शिवाजी सावंत आदि उपस्थित होते.