बाबासाहेबांच्या जीवनावर नाट्यदर्शन

By admin | Published: April 26, 2016 02:23 AM2016-04-26T02:23:31+5:302016-04-26T02:23:31+5:30

येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता झाली.

Drama show on Babasaheb's life | बाबासाहेबांच्या जीवनावर नाट्यदर्शन

बाबासाहेबांच्या जीवनावर नाट्यदर्शन

Next

सांगवी : येथील पीडब्ल्यूडी मैदानावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सवाची सांगता झाली. या वेळी अरविंद मोहितेप्रस्तुत ‘धम्मपद एक धम्मदेसना’ या कार्यक्रमात तथागत गौतमबुद्ध आणि डॉ. आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीते व नाट्यरचना सादर करण्यात आल्या.
महोत्सवाच्या सांगता सोहळ्यास महापौर शकुंतला धराडे, आमदार लक्ष्मण जगताप, माजी आमदार अण्णा बनसोडे, नगरसेविका वैशाली जवळकर, संयुक्त जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमरसिंग आदियाल, कार्याध्यक्ष राहुल काकडे, गौतम सोनवणे, चंद्रकांत वाकोळे, राष्ट्रवादी विद्यार्थी कॉँग्रेस संघटनेचे शहराध्यक्ष हर्षल ढोरे, अ‍ॅड. राजेश नितनवरे, महेंद्रसिंग आदियाल, वसंत कांबळे, आशिष सोनवणे, नयन अहिरे, उमेश जगताप आदी या वेळी उपस्थित होते. या वेळी झालेल्या रक्तदान शिबिरात दीडशे जणांनी रक्तदान केले.
अमरसिंग आदियाल
यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन राहुल काकडे, आभार चंद्रकांत वाकोळे यांनी मानले. धम्मपद एक धम्मदेसना या कार्यक्रमात तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित गीते व नाट्यरचना सादर करण्यात आली. सुहास साळवी यांनी निवेदन केले. संगीत संयोजन तुषार रणखांबे, अर्चना मोहिते, गायन बालकलाकार अथर्व मोहिते, योगेश पवार, अमित पवार, सुवर्णा खांडेकर, आम्रपाली भादवे यांनी केले. पस्तीस कलावंतांनी नृत्यनाटिका, तसेच चळवळीची व प्रबोधनाची भीम गीते सादर केली. (वार्ताहर)

Web Title: Drama show on Babasaheb's life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.