नाटकांमुळे संवेदनशीलता वाढते : संपदा जोगळेकर; बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचा पुण्यात समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:41 PM2018-02-12T13:41:18+5:302018-02-12T13:46:53+5:30

रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात. मुले हळूहळू पुढे जातील. त्यांना सारखे धावायला लावू नका. त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले.

Dramas increase sensitivity: Sampada Joglekar; program in Balranjan Kendra in Pune | नाटकांमुळे संवेदनशीलता वाढते : संपदा जोगळेकर; बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचा पुण्यात समारोप

नाटकांमुळे संवेदनशीलता वाढते : संपदा जोगळेकर; बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाचा पुण्यात समारोप

Next
ठळक मुद्दे ‘न वितळणारा हमकण’ व ‘खमंग दुपार’ ही नाटके झाली सादर २५ वर्षे बालरंजनच्या नाटकांचे रंगभूषाकार असलेल्या प्रभाकर भावे यांचा झाला सत्कार

पुणे : नाटक हे एक संस्काराचे माध्यम आहे. नाटक आपल्याला संवेदनशील बनविते... इथे रंगमंचावर मुले संवेदनशीलतेचे श्वास घ्यायला शिकतात. मुले हळूहळू पुढे जातील. त्यांना सारखे धावायला लावू नका. त्यांच्या मानगुटीवर बसून त्यांचं जगणं थांबवू नका, असे अभिनेत्री व दिग्दर्शिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी यांनी सांगितले. बालरंजन केंद्राच्या नाट्यवर्गाच्या समारोपाप्रसंगी त्या पालकांशी बोलत होत्या.
या वेळी ‘न वितळणारा हमकण’ व ‘खमंग दुपार’ ही नाटकेही सादर झाली.  देवेंद्र व रेणुका भिडे यांनी या वर्षी नाट्यवर्गाचे मार्गदर्शक म्हणून काम पाहिले. प्रज्ञा गोवईकर, दीप्ती कौलगुड व किशोरी कुलकर्णी यांनी साप्ताहिक सहामाही नाट्यवर्गाचे व्यवस्थापन सांभाळले. या वेळी डॉ. नीलिमा गुंडी, विदुला कुडेकर, शशिकला चव्हाण, अलका जोशी, रेवती थिटे उपस्थित होत्या. गेली २५ वर्षे बालरंजनच्या नाटकांचे रंगभूषाकार असलेल्या प्रभाकर भावे यांचा सत्कार करण्यात आला. 
घोले रस्त्यावरील जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवनात झालेल्या या कार्यक्रमात,‘टीम श्यामची आई’चे संपदा जोगळेकर यांनी कौतुक केले.  साने गुरुजींची आई हा विषय आजच्या काळात निवडण्याचे धाडस केल्याबद्दल त्यांनी संयोजकांचे अभिनंदन केले. साने गुरुजींची आई यशोदा साने यांचे हे जन्मशताब्दी वर्ष असल्याने हा विषय निवडल्याचे बालरंजन केंद्राच्या संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले. 

Web Title: Dramas increase sensitivity: Sampada Joglekar; program in Balranjan Kendra in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे