स्वातंत्र्यदिनानिमित्त घरखरेदीचे स्वप्न करा साकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:16 AM2021-08-14T04:16:06+5:302021-08-14T04:16:06+5:30

स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. काही जण भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही घराकडे पाहतात. शहरीकरणाचा वेग, खेड्यातून होणारे ...

Dream of buying a house for Independence Day | स्वातंत्र्यदिनानिमित्त घरखरेदीचे स्वप्न करा साकार

स्वातंत्र्यदिनानिमित्त घरखरेदीचे स्वप्न करा साकार

Next

स्वतःचे हक्काचे घर असावे, असे प्रत्येकालाच वाटत असते. काही जण भविष्यातील गुंतवणूक म्हणूनही घराकडे पाहतात. शहरीकरणाचा वेग, खेड्यातून होणारे स्थलांतर यामुळे बांधकाम क्षेत्राची वाढ झाली आहे. रिअल इस्टेटमधील गुंतवणूक ही चांगला परतावा देणारी म्हणूनही ओळखली जातेत. सोने, बँक, पोस्टाच्या विविध योजना याबरोबरच सुरक्षित, फायदेशीर गुंतवणूक म्हणून सामान्य ग्राहक रिअल इस्टेटकडे पाहतो.

२००० ते २०१२ या काळापर्यंत घरांच्या किमती महागाईच्या दराप्रमाणे आवाक्यात होत्या. मात्र त्यानंतर पुढील ६-८ वर्षांत ग्राहकांचा वाढता कल बघता त्यात किंमत वाढण्याचा आलेख उंचावतच राहिला. मात्र या क्षेत्राला अनपेक्षित धक्के आणि वळणे भविष्यात प्राप्त झाली. सर्वप्रथम नोटबंदी त्यानंतर जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) प्रणाली अस्तित्वात आली. यामुळे काही प्रमाणात ग्राहकांवर हा अतिरिक्त ताण पडला. यानंतर मात्र महारेरा कायद्याची अंमलबजावणी झाली. ही गोष्ट ग्राहक आणि बांधकाम व्यावसायिक दोन्हींच्या हिताची होती. यामुळे काही व्यावसायिकांकडून ग्राहकांची होणारी संभाव्य फसवणूक टळली. मात्र कालांतराने शेअर्स, म्युच्युअल फंड, सोने या क्षेत्रात मिळणारा परतावा आणि फ्लॅटस विकत घेतलेली किंमत, त्यावरील व्याज याचे गणित बिघडू लागल्याने काही ग्राहक भाड्याच्या घरांकडे वळाले. या सर्व परिस्थतीनंतर कोरोना हा अपरिचित असणारा शब्द कानावर पडला. हा फक्त शब्द नसून महामारीचा रोग आहे. रोगाची व्याप्ती, एवढी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सगळे व्यवहार, उलाढाल काही महिन्यांसाठी थांबले. यात भर म्हणून हातावर पोट असणारा आणि मोलमजुरी करणारा कामगारवर्ग भीतीपोटी गावाला निघून गेला आणि त्यामुळे सुरु असलेले बांधकामसुद्धा रेंगाळले.

या सर्व प्रकारात दोन तीन नव्या संज्ञांची भर पडली. ती म्हणजे वर्क फ्रॉम होम. यामध्ये अनेक जण गेले कित्येक महिने आपल्या ऑफिसमधील काम घरबसल्या करत आहेत. शाळा बंद असल्याने लाखो विद्यार्थी आपल्या घरातूनच शिक्षण घेऊ लागले आणि त्यामुळे अनेकांना आपल्या घरात अतिरिक्त जागा असावी अशी गरज वाटू लागली.

सरकारने स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन शुल्कात सवलत दिली आहे. त्यामुळे ग्राहकांचा फायदा वाढला आहे. ग्राहक मोठ्या संख्येने पुन्हा एकदा घरखरेदीकडे वळला आणि या क्षेत्राला पुन्हा नवी उभारी मिळाली आहे.

नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी अशी सणांचा हंगाम सुरू होणार आहे. यादरम्यान ग्राहक घरखरेदीवर मिळणाऱ्या ऑफर्स, नवनवीन योजना यांच्याकडे आकर्षित होऊन घरखरेदीचा निर्णय घेतो.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आपण प्रवेश करत आहोत. अनेक बांधकाम व्यावसायिकांनी यादरम्यान विविध योजना ग्राहकांसाठी सादर केल्या आहेत. यामध्ये जीएसटीमध्ये सवलत, प्रतिचौरस फूट दरामध्ये सवलत, घरखरेदीसोबत फर्निचर, किचन ट्रॉली, सोलर सिस्टिम अशा अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.

कॊरोनानंतर ग्राहक पुन्हा एकदा मोठ्या घरांकडे वळू लागला आहे. घर खरेदी करताना त्या प्रकल्पाचे ठिकाण, तेथून जवळची सोयीची ठिकाणे, शैक्षणिक संस्था, ऑफिस, भाजी मंडई अशा सुविधांचा ग्राहक नेहमीच विचार करतो.

आपणसुद्धा जर आपल्या स्वप्नातील घर शोधात असाल तर याच अंकात आपल्याला त्याचे योग्य उत्तर सापडेल, कारण अनेक बांधकाम व्यावसायिकांनी आपल्या प्रकल्पांची जाहिरात करून अनेक सवलतींची घोषणा केलेली आहे तरी आपण या सवलतींचा नक्की विचार करून योग्य निर्णय घ्या आणि गृहखरेदीचे आपले स्वप्नपूर्तीचे क्षण प्रत्यक्षात आणा.

Web Title: Dream of buying a house for Independence Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.