पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 13:59 IST2025-01-27T13:57:36+5:302025-01-27T13:59:10+5:30

एका ग्रुपसोबत राजगडावर भटकंती करून झाल्यावर खाली उतरत असताना पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून तरुणाच्या डोक्यात पडला

Dream of becoming a police officer remains unfulfilled; A young man who was walking at Rajgad died after a stone fell on his head | पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

पोलीस होण्याचे स्वप्न अपूर्णच; राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाच्या डोक्यात दगड पडून मृत्यू

वेल्हे: राजगडावर फिरायला गेलेल्या तरुणाचा डोक्यात दगड पडून मृत्यू झाल्याची घटना वेल्हे तालुक्यात घडली आहे. राजगडच्या तटबंदीचा दगड अचानक कोसळून तरुणाच्या डोक्यात पडल्याने गंभीर जखमी होऊन मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अनिल विठ्ठल आवटे (वय 17 वर्षे) असे या तरुणाचे नाव असून तो टमरीन पार्क महादेव मंदिराजवळ धायरी पुणे येथे राहत होता. तर मूळगाव रा. खाद गाव ता. सेलू जि. परभणी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

किल्ले राजगडावर तटबंदीचा दगड डोक्यात पडून युवकाचा मृत्यू झाल्याची माहिती वेल्हे पोलिसांनी दिली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, 26 जानेवारीला सुट्टीच्या निमित्ताने पुण्यातील ग्रुप राजगडावर फिरायला आलेला होता. किल्ल्यावर भटकंती करून ते सगळे खाली उतरत होते. राजगडाच्या पाली दरवाजाजवळ बुरुजाचा दगड कोसळून अनिलच्या डोक्यात पडला. या घटनेत तो गंभीर जखमी होऊन त्याच्या कानातून रक्त येऊ लागले होते. त्याच क्षणी बरोबर असणाऱ्या सहकाऱ्यांनी उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालय वेल्हे येथे दाखल केले. डॉक्टरांनी तपासल्यानंतर अनिलला मृत घोषित केले. अनिल विठ्ठल आवटे हा असून सध्या   टमरीन पार्क महादेव मंदिराजवळ धायरी येथे राहत होता. त्याचे मूळगाव रा. खाद गाव ता. सेलू जि. परभणी असे आहे. अनिल विठ्ठल आवटे हा पोलीस भरतीची तयारी करीत होता. यासाठी तो आपल्या मामाकडे धायरी येथे राहत होता. याबाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली ज्ञानदीप धिवार करीत आहेत. 

Web Title: Dream of becoming a police officer remains unfulfilled; A young man who was walking at Rajgad died after a stone fell on his head

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.