श्रमदानातून खोदला साठवण तलाव

By admin | Published: November 18, 2016 05:45 AM2016-11-18T05:45:12+5:302016-11-18T05:45:12+5:30

नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात निसर्गसंवर्धनासाठी पोलीस जवानांनी श्रमदान व तांत्रिकीकरणातून ३ कोटी लिटर पाणीसाठा होईल

Dredged storage tank | श्रमदानातून खोदला साठवण तलाव

श्रमदानातून खोदला साठवण तलाव

Next

दौंड : नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्रात निसर्गसंवर्धनासाठी पोलीस जवानांनी श्रमदान व तांत्रिकीकरणातून ३ कोटी लिटर पाणीसाठा होईल, असा तलाव बांधल्याची माहिती नानवीज पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य विजयकुमार मगर यांनी दिली.
प्रशिक्षण केंद्रात सुमारे अडीच हजार झाडांचे वृक्षारोपण केले असून, भविष्यात या झाडांना पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र, वापरात येणाऱ्या पाण्यासाठी दीड वर्षापूर्वी प्रशिक्षण केंद्राला पाणीटंचाई भासत होती.
केंद्रात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. दरम्यान, अप्पर पोलीस महासंचालक व्यंकटेशन यांनी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. पाणी नियोजन व निसर्गसंवर्धनाच्या सूचना त्यांनी दिल्या. त्यांच्या सूचनांचे पालन करून अडीच महिन्यांत १२५ मीटर लांब, ३५ मीटर रुंद व १२ मीटर खोलीचा मोठा खड्डा श्रमदान व जेसीबीतून खोदला. ७५ एकरांचा हा परिसर असून परिसरात नारळ, जांभूळ, चिंच, सावली, कशिद, कवट, वाळवा, पिंपरी, गुलमोहर, रेणद्री, बेडा, सीताफळ, नारळ यासारखी सुमारे अडीच हजार झाडे लावली आहेत.

Web Title: Dredged storage tank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.