द्राक्ष उत्पादक धास्तावले, ऊसतोड थांबली

By Admin | Published: November 15, 2014 11:52 PM2014-11-15T23:52:29+5:302014-11-15T23:52:29+5:30

बारामती शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात शुक्रवारी (दि. 14) आणि शनिवारी (दि. 15) सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली.

Dried grape growers, they stopped | द्राक्ष उत्पादक धास्तावले, ऊसतोड थांबली

द्राक्ष उत्पादक धास्तावले, ऊसतोड थांबली

googlenewsNext
बारामती :  बारामती शहर आणि परिसरातील ग्रामीण भागात शुक्रवारी (दि. 14) आणि शनिवारी (दि. 15) सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे जिरायती भागातील ज्वारीला जीवदान मिळाले आहे; मात्र या पावसामुळे द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत. 
बारामती आणि इंदापूर तालुक्यात मागील तीन   दिवसांपासून ढगाळ वातावरम होते. शुक्रवरी रात्री परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. शनिवारी सकाळीही पावसाचा जोर कयम होता. या पावसामुळे रब्बीच्या पेरण्यांना वेग येणार आहे. 
रब्बीच्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर असला तरी द्राक्ष बागांसाठी या पावसाने रोगास पोषक वातावरण तयार केले आहे.  या पावसामुळे गव्हाच्या पेरण्याही लांबण्याची शक्यता आहे. या पावसामुळे बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील पिकांना फायदा होणार आहे. पोट:यात असणा:या ज्वारी पिकाला या पावसामुळे जीवदान मिळाले आहे. 
तसेच भाजीपाला पिकांनाही या पावासाचा फायदा होणार आहे.  मात्र बारामती तालुक्याच्या सोमेश्वर, माळेगाव आणि इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी, निरा-भिमा, छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रतही जोरदार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे ऊसतोडी थांबणार आहेत. शेतातील पाणी निघेर्पयत ऊस तोडी पुन्हा सुरू होऊ शकणार नाहीत. त्याचप्रमाणो चिखलामुळे ऊस वाहतूकीसही दोन ते तीन दिवस अडथळा निर्माण होऊ शकतो. (वार्ताहर)
 
4बारामती तालुक्याच्या जीरायत पट्टय़ामध्ये सध्या ज्वारीचे पीक काही ठिकाणी पोट:यात आले आहे. यापावसामुळे ज्वारीची कनसे भरण्यास मदतच होणार आहे. यापावसामुळे जीरायती भागातील रब्बीच्या पिकांना फायदा होणार आहे. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष बरकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. 

 

Web Title: Dried grape growers, they stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.