दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2024 12:40 PM2024-09-20T12:40:11+5:302024-09-20T12:41:24+5:30

नशेत असताना अजून दारूचे आमिष दाखवून त्या व्यक्तीला ओढ्याजवळील शेतात गळा आवळून मारले

Drinking alcohol causes constant trouble Two killed one an incident in Khed taluka | दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना

दारू पिऊन सतत त्रास देतो; दोघांनी केला एकाचा खून, खेड तालुक्यातील घटना

चाकण: मागील सहा महिन्यांपासून दारू पिऊन वेळोवेळी केलेल्या मारहाणीच्या रागातून लाकडी दांडक्याने आणि गळा आवळून एकास जीवे ठार मारल्याची घटना रासे (ता.खेड ) गावच्या हद्दीत उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
संदीप उर्फ बाळशीराम शिवाजी खंडे (वय.४० वर्षे,रा.ठाकर वस्ती,रासे) असे खून करण्यात आल्याचे नाव आहे. सुरेश ज्ञानेश्वर मेंगाळ (वय.३६ वर्षे,रा.ठाकर वस्ती,रासे ) आणि दिलीप ऊर्फ टपाल अघान (नाव,पत्ता माहिती नाही) यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून चाकण पोलीसांनी एकास आणि गुन्हे शाखा युनिट तीनच्या पोलिसांनी एक आरोपीस अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पवार यांनी दिली.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील सहा महिन्यांपासून सुरेश याचा दूरचा मामा संदीप हा छोट्या मोठ्या कारणावरून लोकांसमोर वाकडे तिकडे बोलून मारहाण शिवीगाळ करायचा. त्यामुळे त्याचा राग अनावर झाल्याने संदीपला कायमचे संपवण्याच्या उद्देशाने (दि.१८ ) ला तो दारूच्या नशेत असल्याने त्यास जास्तच्या दारूचे आमिष दाखवले. रासे गावच्या हद्दीतील मुंगसेवस्ती ओढ्याजवळील शेतात निर्जनस्थळी झोपवले. दारू आणण्यासाठी जातो असे सांगत सुरेश याने जवळचा मित्र दिलीप ऊर्फ टपाल अघान याला सोबतीला घेतले. संदीप झोपलेल्या ठिकाणी येऊन, टपाल याने जवळ असलेल्या लाकडी दांडक्याने संदिप ऊर्फ बाळशीराम याचे तोंडावर लागडी दांडक्याने जोर जोरात मारहाण केली. त्यानंतर सुरेश याने हाताने त्याचा जिव जाईपर्यंत गळा आवळाल्यावर संदीपची पुर्ण हालचाल थांबल्यानंतर त्याला बाजुचे झुडपात ढकलुन दिले. पुढील तपास चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड करीत आहेत.

Web Title: Drinking alcohol causes constant trouble Two killed one an incident in Khed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.