उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत पिणं झालं अवघड; अवकाळी पावसाचा लिंबूला फटका

By अजित घस्ते | Published: April 16, 2023 04:21 PM2023-04-16T16:21:05+5:302023-04-16T16:22:05+5:30

अतिवृष्टीमुळे लिंबूचे मोठे नुकसान झाले असून लिंबू कुजले

Drinking cold lemonade in summer became difficult Unseasonal rains hit lemons | उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत पिणं झालं अवघड; अवकाळी पावसाचा लिंबूला फटका

उन्हाळ्यात थंडगार लिंबू सरबत पिणं झालं अवघड; अवकाळी पावसाचा लिंबूला फटका

googlenewsNext

पुणे : उन्हाळयात लिंबूना मागणी अधिक असते मात्र सध्या उन्हाळा सुरू असला तरी अवकाळी पाऊसाचा धडाका सुरू असल्याने शेतक-यांचे नियोजन कोलमाडले असून आर्थिक नुकसान होत आहे. त्याचा लिंबू उत्पादक शेतक-यांना याचा फटका बसला आहे. सध्या उन्हाळयाचा हंगाम सुरू असला तरी अवकाळी पाऊस पडत असल्याने ग्राहकांच्याकडून लिंबूला मागणी कमी होत आहे.

उन्हाळा सुरू होताच मागच्या दोन महिन्यांत लिंबाच्या दराने उच्चांक गाठला होता. देशातील प्रत्येक राज्यात लिबांच्या दरात मोठी वाढ झाली होती. १० ते १२ रुपयाला मिळणारा लिंबू आता २ ते ३ रूपयात विकला जात आहे. लिंबूच्या दरात अचानक घसरण झाल्याने लिंबू उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. सिझनलाच दर उतरल्याने उत्पादन होणाऱ्या लिंबांचे करायचे काय  हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडत आहे.

''अतिवृष्टीमुळे लिंबूचे मोठे नुकसान झाल्याने लिंबू कुजतात आणि लिंबू वर परिणाम होत आहे. सध्या दर ही घटले आहेत त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी नुकसान झाले आहे. सध्या बाजारात कच्चा माल आहे उन्हाळाच्या हंगामात तयार लिंबूला एक महिना लागेल. -अनिल जगताप लिंबू शेतकरी रासन कर्जत नगर'' 

Web Title: Drinking cold lemonade in summer became difficult Unseasonal rains hit lemons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.