भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 12:36 AM2018-12-27T00:36:24+5:302018-12-27T00:37:18+5:30

धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.

Drinking water in Bhor taluka along with agriculture is serious | भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

भोर तालुक्यात शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Next

भोर : धोमबलकवडी कालव्याला सोडलेले पाणी बंद होण्याची वेळ आली, तरी चिखलगाव-धोंडेवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नसल्याने व म्हकोशी बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने चार गावांतील शेतीला व पिण्याच्या पाणीपुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे. पाणी सोडण्याबाबत वाई पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची शेतक-यांनी भेट घेऊन निवेदन देऊनही पाणी सोडत नसल्याने संतप्त शेतकºयांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वीसगाव व आंबवडे खोºयातील बागायती पिके वाळून जात असल्याने शेतक-यांनी शेतीला पाण्याचे आर्वतन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार मागील आठवडाभरापासून धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून पाण्याचे आर्वतन सुरू आहे. मात्र, चिखलगाव येथील धोंडवाडी येथील पोटचारीला पाणी सोडले नाही. त्यामुळे टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी, चिखलगाव येथील बागायती पिके पाण्याआभावी जळू लागली आहेत. तर, म्हाकोशी बंधाºयातील पाणीसाठा अत्यंत कमी झाल्याने बंधाºयाच्या पाण्यावर असलेल्या टिटेघर, कोर्ले, वडतुंबी, म्हकोशी येथील नळपाणी पुरवठा योजनांना पाणी कमी पडत आहे.

टिटेघर गावातील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीच्या सदस्यांनी आणि शेतकºयांनी वाई पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन निवेदन देऊन पाणी सोडण्याची मागणी केली होती.त्या वेळी लवकरच पाणी सोडण्याचे आश्वासन देण्यात आले; मात्र अद्याप पाणी सोडलेले नसून धोमबलकवडी धरणाच्या कालव्याचे पाणी सोडण्याचे २८ डिसेंबरला बंद करण्याची शक्यता आहे आणि तसे झाल्यास पोटचाºयांना पाणी मिळणार नसल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या नळपाणी पुरवठा योजना उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच अडचणीत येतील. यामुळे संतप्त शेतकरी नाराज झाले असून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, धोमबलकवडी धरणाच्या पोटचाºयांना पाणी सोडावे म्हणून सोपान नवघणे, अरविंद जाधव, मोहन जेधे, राजेंद्र साळेकर, चंद्रकांत साळेकर यांनी व शेतकºयांनी आमदार संग्राम थोपटे यांची भेट घेऊन निवेदन दिले. धोमबलकवडी धरणाच्या कालव्यातून शेतीला व पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सुरू असून कालव्यातून धोंडेवाडी येथील पोटचाºयांना पाणी सोडण्याच्या सूचना वाई पाटबंधारे विभागाला देण्यात आल्या आहेत. पाणी सुरू होईल, असे आमदार संग्राम थोपटे
यांनी सांगितले.

Web Title: Drinking water in Bhor taluka along with agriculture is serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे