पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 02:34 AM2019-03-22T02:34:14+5:302019-03-22T02:34:48+5:30

पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे.

Drinking water for irrigation? Irrigation water contamination disorders in rural areas | पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

पाणी प्यायला की सिंचनाला ? सिंचन पाणी कपातीने ग्रामीण भागात अस्वस्थता

Next

- विशाल शिर्के

पुणे - पुण्याची पाण्याची तहान अगदी साडेअठरा अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्यातही भागत नसल्याने सिंचनाच्या पाण्याचा घोट पुणेकरच घेत असल्याची भावना ग्रामीण भागात तीव्र होऊ लागली आहे. पुण्याने आपला पाणीवापर मानकाप्रमाणे करावा, या मागणीसाठी काही शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजादेखील ठोठावला आहे. प्रत्येक वेळी पाऊण लाख हेक्टर शेतीचे पाणी कमी करु देणार नाही, असे ठामपणे शेतकरी बोलू लागले आहेत.

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने ८९२ दशलक्ष लिटर (वार्षिक ११.५० टीएमसी) पाणी वापरण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, २०११ ते २०१७ पर्यंत महापालिकेने १६ ते पावणेसतरा टीएमसी पाणीवापर केला आहे. तर, २०१७-१८ मध्ये १८.७१ टीएमसी इतका वार्षिक वापर झाला आहे. दुष्काळसदृश स्थिती आणि जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाचा आदेश यामुळे अखेरीस महापालिका १३५० एमएलडी (वार्षिक १७.३९ टीएमसी) दैनंदिन पाणीवापरास तयार झाली. शहरासह लगतच्या गावांना खडकवासला धरण साखळीतील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणसाखळीतून पाणीपुरवठा होतो. या धरणाची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता २९ टीएमसी आहे. ही धरणे मूळची सिंचनासाठी बांधलेली. शहराची गरज म्हणून महापालिकेशी जलसंपदा करार करते. त्यानुसार पावसाळा संपल्यानंतर कालवा समितीच्या बैठकीत उपलब्ध पाणीसाठ्यावर सिंचन, पाणी आणि उद्योगाला किती पाणी द्यायचे हे ठरते. वार्षिक ३ टीएमसीचे बाष्पीभवन गृहीत धरून नियोजन केले जाते. साधारण रब्बी आणि उन्हाळी अशी चार आवर्तने शेतीला देणे अपेक्षित आहे.

महापालिकेने पाण्याची गळती ३५ वरून १५ टक्क्यांपर्यंत खाली आणल्यास वाढत्या लोकसंख्येला पाणी पुरविता येऊ शकते. तसेच, शेतीसाठी देखील यापुढे ठिबक सिंचनाचा वापर वाढवावा लागेल. तरच, महापालिका आणि शेतीसाठी पाण्याचा समतोल राखला जाऊ शकतो.
- जलसंपदा विभाग

पुणे महापालिका मापदंडानुसार पाणीवापर नसल्याने सिंचनाच्या पाण्यावर ताण येत आहे. उपलब्ध पाण्यानुसार दरवर्षी पाण्याचे नियोजन केले जाते. त्यानुसार रब्बीत दोन आणि उन्हाळ्यात दोन आवर्तन देणे अपेक्षित आहे. शहराचा पाणीवापर सातत्याने वाढल्यास ते शक्य होत नाही. त्यामुळे महापालिकेने मापदंडानुसार पाणी वापरावे, अशी आमची मागणी आहे. महापालिकेने गळती कमी केल्यास आणि रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते.
- विठ्ठल जराड, याचिकाकर्ते शेतकरी, बारामती

Web Title: Drinking water for irrigation? Irrigation water contamination disorders in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.