मिनीबस शहरात नको, तर उपनगरात चालवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:09 AM2021-07-09T04:09:19+5:302021-07-09T04:09:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे :शुक्रवारपासून शहारात अटल सेवेच्या ९ मार्गांवर मिनीबस सेवेचा शुभारंभ होत आहे. सुरुवातीला ५० नंतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे :शुक्रवारपासून शहारात अटल सेवेच्या ९ मार्गांवर मिनीबस सेवेचा शुभारंभ होत आहे. सुरुवातीला ५० नंतर ३०० मिनी बसेस धावण्याचे नियोजन आहे. मात्र, ह्या बससेवेमुळे रिक्षाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. रोज रिक्षांच्या २२ हजार फेऱ्या रद्द होतील, असा अंदाज आहे. तेव्हा मिनी बसला शहरात परवानगी न देता उपनगरात फिडर सर्व्हिस म्हणून परवानगी देण्यात यावी अशी मागणी आम आदमी रिक्षा चालक संघटनेचे सल्लागार श्रीकांत आचार्य यांनी केली आहे.
सध्या रिक्षाचालक मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. त्यात आता शहराच्या मुख्य भागात १० रुपयांत दिवसभर वातानुकूलित बसमधून प्रवास करता येणार आहे.
५० मिनी बस शहराच्या ९ मार्गांवर प्रवासी वाहतूक करेल. प्रत्येक बसने दिवसाला १५ फेऱ्या करून किमान १० प्रवाशांची वाहतूक केली, तर १५० प्रवासी होतील. याचप्रमाणे ५० बसचा विचार केला तर दिवसाला ७५०० प्रवासी मिनी बसमधून प्रवास करतील. त्यामुळे रिक्षाच्या मोठ्या प्रमाणात फेऱ्या रद्द होतील. तेव्हा जिल्हा प्रशासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा असेही निवदेनात म्हटले आहे.