रंगांधळेपणाच्या प्रमाणपत्रावरून ‘एसटी’ला गंडवले, चालकाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:09 AM2021-05-22T04:09:40+5:302021-05-22T04:09:40+5:30
रतन संपत्ती लगड (वय ४२, रा. तेलगाव बुद्रुक, धारूर बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ तिकोटकर (वय ...
रतन संपत्ती लगड (वय ४२, रा. तेलगाव बुद्रुक, धारूर बीड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सोमनाथ तिकोटकर (वय ४८) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात तिकोटकर हे वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी आहेत. आरोपी रतन लगड याने रंगआंधळेपणाचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर केली.
त्यात लगड याने स्वतःचे आधारकार्ड, बीडमधील आरटीओ लायसन्समध्ये फेरफार केला. त्यानंतर एसटी महामंडळाकडून रंगांधळेपणाच्या प्रमाणपत्रासाठी आवश्यक तपासणीला स्वतः हजर न राहता डमी व्यक्तीला उभे केले. त्यानंतर संबंधित प्रमाणपत्र मिळवून एसटी महामंडळाची फसवणूक केली आहे. त्याशिवाय पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक शैलेजा शिंदे तपास करीत आहेत.