प्रवाशांवर दादागिरी करणारे वाहक, चालक निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 03:50 AM2018-05-10T03:50:51+5:302018-05-10T03:50:51+5:30

पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना दोन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे.

Driver & Conductor suspended News | प्रवाशांवर दादागिरी करणारे वाहक, चालक निलंबित

प्रवाशांवर दादागिरी करणारे वाहक, चालक निलंबित

Next

पुणे - पीएमपी प्रवाशाची तक्रार नोंदवून घेण्याऐवजी हद्दीचा वाद घालून त्याला शिवीगाळ करणाऱ्या सहकारनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक भागवत बडे यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले आहेत. याबाबतची चौकशी सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्याकडे सोपविण्यात आली असून त्यांना दोन दिवसांत अहवाल देण्याचा आदेश दिला आहे. पीएमपीनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रवाशांवर दादागिरी करणाºया चालक, वाहकास पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांनी निलंबित केले आहे़
चंद्रकांत भिकोबा पवार (चालक), सौरभ बबन पवार (वाहक) अशी निलंबित कर्मचाºयांची नावे आहेत़ स्वारगेट ते कात्रजदरम्यान पीएमपीच्या रातराणी बसमधून हनुमंत पवार आणि त्यांचे कुटुंबीय प्रवास करीत होते़ महिलांच्या जागेवर काही पुरुष बसले होते़ पवार यांनी वाहक सौरभ पवार यांना पुरुषांना उठवून महिलांना बसायला जागा करून द्यावी, अशी विनंती केली़ तेव्हा पवार यांनी आपल्याला तेवढेच काम आहे का, असे सांगून ते तिकीट काढण्यात मग्न राहिले़ त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून त्याची माहिती दिली. बस पोलीस ठाण्यात न्या, असे सांगितल्यावर वाहकाने त्यांना शिवीगाळ करीत बसमधून खाली उतरविले़ कुटुंबीय बसमध्ये असताना बस तशीच घेऊन निघून गेले़ पोलिसांनी हद्दीचा वाद घातला़ त्यानंतर पोलिसांनी त्यांना सहकारनगर पोलीस ठाण्यात नेले़ तेथे पोलीस उपनिरीक्षक बडे यांनी पवार यांना शिवीगाळ केली़ मध्यरात्रीनंतर त्यांची तक्रार घेऊन वाहक सौरभ पवार यांच्यावर अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली़ हनुमंत पवार यांच्यावरही अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली़
या घटनेची पोलीस आणि पीएमपी प्रशासनाने गंभीर दखल घेतली़ पोलीस उपायुक्त डॉ़ प्रवीण मुंढे यांनी सांगितले, की पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांची प्रवासी हनुमंत पवार यांनी भेट घेऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली़ त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत़ सहायक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांना दोन दिवसांत चौकशी करून अहवाल देण्याचा आदेश दिला आहे़

आरक्षित जागेवर महिलांचा हक्क
मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन दोघाही कर्मचाºयांना तातडीने निलंबित करण्यात आले आहे़ त्यांची चौकशी केली जाईल़ पीएमपीमध्ये प्रवास करीत असताना डावी बाजू महिलांसाठी राखीव असते़ अशा जागेवर बसण्याचा महिलांचा हक्क आहे़ याबाबत कोणी पुरुष प्रवासी जर महिलांची अडवणूक करीत असेल तर पीएमपीच्या वाहकांनी महिलेला मदत करणे गरजेचे आहे़ - नयना गुंडे, व्य. संचालिका, पीएमपी

वाहकावर गुन्हा दाखल : प्रवाशाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सहकानगर पोलिसांनी पीएमपी वाहक सौरभ पवार (वय ३०, रा़ दत्तनगर, जांभुळवाडी, कात्रज) याच्याविरुद्ध बुधवारी रात्री गुन्हा दाखल केला़ पवार यांनी वाद घालून हनुमंत पवार यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांच्या हातातील मोबाईल पाडून १ हजार रुपयांचे नुकसान केले़ सार्वजनिक ठिकाणी त्यांना अश्लील शिवीगाळ करून अपमान केला. या प्रकरणात अगोदर पोलिसांनी हनुमंत पवार यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला होता़

महिला आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी
पीएमपी बसमध्ये मध्यरात्री घडलेल्या घटनेमुळे महिला प्रवाशांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर पुरुष बसलेले असतात़ अशा वेळी वाहकाने आपली जबाबदारी ओळखून आरक्षित जागेवर महिलेला बसू न देणाºयांना विचारणा करून त्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे़ जर महिलेला आरक्षित जागेवर बसू न देणारे लोक दांडगाई करत असतील तर अशा वेळी गाडी नजीकच्या पोलीस चौकीत नेणे अपेक्षित आहे़ पण तसे घडत नाही़ महिला प्रवासी आरक्षणाची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, अशी मागणी पीएमपी अध्यक्षा नयना गुंडे यांच्याकडे केली आहे़
- डॉ. नीलम गो-हे, आमदार

Web Title: Driver & Conductor suspended News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.